शिक्षणव्यवस्थेतून उमटावे समाजाचे प्रतिबिंब : डॉ. अनिल काकोडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 05:48 PM2018-02-19T17:48:34+5:302018-02-19T17:53:28+5:30

गोसावी यांच्या हस्ते माशेलकर यांचा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच काकोडकरांनाही सन्मानित करण्यात आले. माशेलकर यांना काकोडकर यांच्या हस्ते संस्थेच्या वतीने फेलोशिप प्रदान करण्यात आली.

Reflections on society from education system: Dr. Anil Kakodkar | शिक्षणव्यवस्थेतून उमटावे समाजाचे प्रतिबिंब : डॉ. अनिल काकोडकर

शिक्षणव्यवस्थेतून उमटावे समाजाचे प्रतिबिंब : डॉ. अनिल काकोडकर

googlenewsNext
ठळक मुद्दे६५ टक्के जनता ग्रामीण भागात वास्तव्यासगोखले एज्युकेशन सोसायटीच्या शतकपूर्ती महोत्सवशहर-ग्रामीण दरी कमी करण्याचे मोठे आव्हान शाश्वत विकासाची कास धरण्याशिवाय पर्याय नाही

नाशिक : तंत्रज्ञानाच्या जोरावर स्थितंत्यरे वेगाने बदलत आहे. शहर-ग्रामीण यांच्यातील दरी या बदलांमुळे वाढतच असून, ही दरी कमी करण्याचे मोठे आव्हान नजीकच्या काळात शिक्षणसंस्थांपुढे उभे राहिले आहे. त्यासाठी शिक्षणपद्धतीमध्ये काही सुधारणा कराव्या लागणार आहे, जेणेकरून समाजाचे प्रतिबिंब उमटविणारी शिक्षणव्यवस्था निर्माण होईल, असे प्रतिपादन भारतीय अुणऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.


गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शतकपूर्ती महोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून काकोडकर बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष अरुण निगवेकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून औद्योगिक संशोधन महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, उत्तरकाशी धर्मपीठाचे प्रमुख जनार्दनदास स्वामी, कीर्तनकार चारुदत्त आफळे, लेखिका इंद्रायणी सावकार, डॉ. प्रभाकर सावकार, संस्थेचे अध्यक्ष प्रिं.एस.बी.पंडित, संस्थेचे सचिव डॉ. मो.स.गोसावी, संचालक प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी काकोडकर म्हणाले, आजच्या ज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात औद्योगिकरण विकेंद्रित स्वरूपात होणे शक्य आहे. तळागाळातील लोकांना उत्पादनाच्या कामात सहभागी करुन घेणेही सहज शक्य आहे. ग्रामीण भागात या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. कारण ६५ टक्के जनता ग्रामीण भागात वास्तव्यास असून, शहरी सुबत्तेसोबत त्यांची काळजीची जाणीव रुजविण्याची जबाबदारी शिक्षणसंस्थांनी स्वीकारावी. वाढत्या विषमतेमुळे निर्माण होणा-या द-या  सुबत्तेला गिळंकृत करणा-या ठरणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. यासाठी शाश्वत विकासाची कास धरण्याशिवाय पर्याय नाही, असा मौलिक सल्लाही काकोडकर यांनी बोलताना दिला.
दरम्यान, ‘शतंजयी’ स्मरणिके सह ‘झेनिथ’,‘गॅलंट’, ‘स्वयंप्रकाश’, ‘निबोधी’, ‘रिसोनन्स’,‘स्पेक्ट्रम’, ‘अवबोध’ आदींचे मान्यवरांचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संस्थेच्या शतकपूर्तीनिमित्त गुरुदक्षिणा सभागृहाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच शिवकालीन शस्त्रांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. याप्रसंगी गोसावी यांच्या हस्ते माशेलकर यांचा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच काकोडकरांनाही सन्मानित करण्यात आले. माशेलकर यांना काकोडकर यांच्या हस्ते संस्थेच्या वतीने फेलोशिप प्रदान करण्यात आली. प्रास्ताविकातून गोसावी यांनी संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला.

Web Title: Reflections on society from education system: Dr. Anil Kakodkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.