रिफ्लेक्टर न लावलेले ट्रॅक्टर सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 04:36 PM2019-01-25T16:36:42+5:302019-01-25T16:36:53+5:30

पिंपळगाव बसवंत : सध्या ऊसतोडणी हंगाम जोमात असून, रस्त्यावर ऊस वाहून नेणाऱ्या विनारिफ्लेक्टर लावलेल्या ट्रॅक्टर्सची वर्दळ वाढली आहे. सदोष पद्धतीने सुरू असणारी ऊस वाहतूक अन्य वाहनचालकांच्या जिवावर उठली आहे. याप्रकारच्या सदोष वाहतुकीमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हात ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टरच्या अपघात संख्येत प्रचंड वाढ झाली असून, निष्पाप नागरिक बळी ठरत आहे.

 Reflector unused tractor suasat | रिफ्लेक्टर न लावलेले ट्रॅक्टर सुसाट

रिफ्लेक्टर न लावलेले ट्रॅक्टर सुसाट

Next
ठळक मुद्दे अपघाताला आमंत्रण : बेकायदेशीर ऊस वाहतुकीमुळे रस्त्यावरील अन्य वाहनांना धोका


पिंपळगाव बसवंत : सध्या ऊसतोडणी हंगाम जोमात असून, रस्त्यावर ऊस वाहून नेणाऱ्या विनारिफ्लेक्टर लावलेल्या ट्रॅक्टर्सची वर्दळ वाढली आहे. सदोष पद्धतीने सुरू असणारी ऊस वाहतूक अन्य वाहनचालकांच्या जिवावर उठली आहे. याप्रकारच्या सदोष वाहतुकीमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हात ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टरच्या अपघात संख्येत प्रचंड वाढ झाली असून, निष्पाप नागरिक बळी ठरत आहे.
ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यावर प्रत्येकवर्षी अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होते. पिंपळगाव परिसरात मागील वर्षीच्या गाळप हंगामातील केवळ तीन महिन्यात सहा अपघात झाले असून, या अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागला होता, तर अनेकजण अजूनही त्या अपघातामुळे त्रास सहन करत आहे. यातून या प्रश्नाचे गांभीर्य समोर येते. साखर कारखाना प्रशासनाकडून ऊस वाहतुकीसाठी प्रामुख्याने ट्रॅक्टर्सना प्राधान्य देण्यात येते.
मात्र वाहनचालकांना वाहतूक नियमाबाबत जनजागृती केली जात नाही. साखर प्रशासनाचे वचक ट्रॅक्टरचालक याच्यावर नसल्याने बेफिकिरीने बेकायदेशीर ऊस वाहतूक केली जाते. त्याचबरोबर ट्रॅक्टरमालकाकडून कमी कालावधीत अधिक नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून ऊस वाहतुकीला प्राधान्य देण्यात येते. परंतु सदर वाहतूक करताना पुरेशी खबरदारी घेण्यात येत नाही. यामुळे वारंवार दुर्घटना घडताना दिसतात.
उसाच्या वाहतुकीनुसार ट्रॅक्टरमालकाला कारखान्याकडून भाडे अदा करण्यात येते. यामुळे ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टरच्या क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरतात. यासाठी सर्रास दोन ट्रॉलींचा वापर करण्यात येतो. एका ट्रॉलीची क्षमता १४ टन इतकी असते. परंतु, यामध्ये १८ ते २० टन भरण्यात येतो. नफा कमाविण्यासाठी बेकायदेशीरपणे अधिक ऊस भरला जातो. हे प्रकार जीवघेणे ठरत आहेत. तसेच सर्रास विनापासिंग ट्रॉलींचा वापर करण्यात येतो. ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टर्संच्या अपघातास प्रामुख्याने ट्रॉली कारणीभूत ठरतात. ट्रॅक्टरला स्वतंत्रपणे ट्रॉली जोडण्यात येते. यामुळे त्यांना इंडिकेटर नसतो. त्याचबरोबर रिफ्लेक्टरदेखील वापरण्यात येत नाही. केवळ एका लाइटच्या जोरावर ट्रॅक्टरचालक बेफामपणे ट्रॅक्टर दामटत असतात. त्यातून अपघात घडून अनेकांचे बळी जातात.
.....
चौकट..
काही दिवसांपूर्वी ‘पडलं तर व्हॉट्सअ‍ॅपवर टाकतो’, असा एक व्हिडीओ व्हायरल होत होता. यामध्ये उसाने ओव्हरलोडेड झालेला ट्रॅक्टर कोसळतो. ट्रॅक्टरमध्ये क्षमता नसताना ऊस भरण्यात आला होता. याचा गांभीर्याने विचार करणे आणि त्यावर कृती होणे गरजेचे आहे.
...........................
विनारिफ्लेक्टर वाहतूक करणारे ट्रॅक्टर रात्रीच्या वेळेत डबल ट्राली लावून जात असतात त्यामुळे अपघात होत असतात.

सुरक्षा सप्ताह केवळ दिखाऊ नको...
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रत्येक वर्षी सुरक्षा सप्ताह छायाचित्रांपुरता साजरा केला जातो, असे दिसते आहे. या कार्यालयाकडून साखर कारखान्यांवर जाऊन ट्रॅक्टर, ट्रेलरला रेडियम पट्ट्या लावून हा सप्ताह साजरा केला जातो. मात्र, आजही या ऊस वाहतूक तसेच इतर वाहनांकडून सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने पाहिले जात नाही, असे असतानाही या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केल्याचे दिसत नाही.

...या करता येतील उपाययोजना
ऊस वाहतुकीच्या वाहनांना सेवा रस्ता सक्तीचा करावा, सर्व वाहनांना सुरक्षेच्या उपाययोजना सक्तीच्या कराव्यात, विनारिफ्लेक्टर वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक बंदीचा विचार व्हावा, ऊस वाहतुकीसह इतर वाहने पार्किंगला बंधने घालावीत, हॉटेलजवळील बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई करावी.
(25पिंपळगाव टृॅक्टर)

Web Title:  Reflector unused tractor suasat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.