प्रभावी अध्यापनासाठी ‘रिफ्रेशर कोर्स’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:58 PM2018-10-11T23:58:06+5:302018-10-12T00:15:30+5:30
शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे अध्यापनाचे काम करतानाच अध्ययनही करणे आवश्यक असल्याने प्राध्यापकांचा वेगवेगळ्या स्तरावर ज्ञान आणि कौशल्य विकास साधण्याच्या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) व विद्यापीठाकडून उजळणी वर्ग (रिफ्रेशर कोर्स) करणे सक्तीचे केले आहे. अशा कोर्समुळे शिक्षकांचा सर्वांगीण विकास साधून विद्यार्थीहित आणि समाजहित साधले जाणार असल्याने नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी ‘रिफ्रेशर कोर्स’ संधी असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी केले.
नाशिक : शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे अध्यापनाचे काम करतानाच अध्ययनही करणे आवश्यक असल्याने प्राध्यापकांचा वेगवेगळ्या स्तरावर ज्ञान आणि कौशल्य विकास साधण्याच्या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) व विद्यापीठाकडून उजळणी वर्ग (रिफ्रेशर कोर्स) करणे सक्तीचे केले आहे. अशा कोर्समुळे शिक्षकांचा सर्वांगीण विकास साधून विद्यार्थीहित आणि समाजहित साधले जाणार असल्याने नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी ‘रिफ्रेशर कोर्स’ संधी असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी केले.
गुरुवारी (दि. ११) माजी आमदार तथा संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उजळणी वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. अरविंद शाळिग्राम म्हणाले की, एकाच वेळी विषय समजावून सांगण्यासाठी नवनवीन कल्पनांच्या आधारे शिकविणे आवश्यक आहे. इंटरनेट व समाजमाध्यमांमुळे विद्यार्थ्यांकडे वेगवेगळी माहिती सहजरीत्या उपलब्ध असते. परंतु त्याविषयी ज्ञान असेलच असे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानसंपन्न करण्यासाठी शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिकविण्याच्या पद्धतीत बदल करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी डॉ. व्ही. एस. मोरे, प्राचार्य डॉ. चंद्रकांत दिघावकर, डॉ. राजेंद्र भांबर, विंचूर दळवी डॉ. रवींद्र देवरे, डॉ. ए. व्ही. पाटील, डॉ. एन. बी. पवार, डॉ. विनीत रकिबे उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. चंद्रकांत दिघावकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मीनाक्षी पाटील यांनी केले. डॉ. ए. व्ही. पाटील यांनी आभार मानले.