अधिकच्या मोबदल्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:35 PM2020-02-25T23:35:19+5:302020-02-26T00:11:37+5:30
समृद्धी महामार्गात निर्यातक्षम द्राक्षाच्या बागा जात असल्याने या बागांचे होणारे नुकसान लक्षात घेता जादा मोबदला मिळावा, अशी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची असलेली मागणी जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा फेटाळली आहे. द्राक्षनिर्यातीच्या दराप्रमाणेच परतावा देण्यात आला असल्याने जादा परतावा देण्याची तरतूद नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. अधिकच्या मोबदल्यासाठी शेतकरी विभागीय आयुक्तांकडे अपील करू शकणार आहेत.
नाशिक : समृद्धी महामार्गात निर्यातक्षम द्राक्षाच्या बागा जात असल्याने या बागांचे होणारे नुकसान लक्षात घेता जादा मोबदला मिळावा, अशी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची असलेली मागणी जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा फेटाळली आहे. द्राक्षनिर्यातीच्या दराप्रमाणेच परतावा देण्यात आला असल्याने जादा परतावा देण्याची तरतूद नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. अधिकच्या मोबदल्यासाठी शेतकरी विभागीय आयुक्तांकडे अपील करू शकणार आहेत.
समृद्धी महामार्गात जाणाºया द्राक्षबागायत शेतकºयांना जालना येथे देण्यात आलेल्या जादा मोबदल्याप्रमाणेच अधिकचा मोबदला मिळावा, अशी सिन्नर तालुक्यातील काही शेतकºयांची मागणी आहे. बागायतदारांना द्राक्षनिर्यातीच्या दराप्रमाणेच परतावा दिल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे अधिकच्या मोबदल्यासाठी शेतकरी अडून बसले असले तरी व्यावहारिकदृष्ट्या ते शक्य होणार नसल्याने शेतकºयांना विभागीय अधिकाºयांकडे दाद मागण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रस्ते विकास महामंडळाकडे संंबंधित शेतकºयांनी दिलेल्या निवदेनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला पुलकुंडवार, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, समृद्धी उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, सिन्नरच्या प्रातांधिकारी अर्चना पठारे, इगतपुरीचे प्रांताधिकारी तसेच संबंधित शेतकरी उपस्थित होते. या शेतकºयांची मागणी विसंगत आणि अव्यहार्य असल्याचे सांगत जिल्हाधिकाºयांनी सदर मागणी फेटाळली आहे.
जिल्ह्यात इगतपुरी आणि सिन्नर या दोन तालुक्यांमधून समृद्धी महामार्ग जाणार आहे. महामार्गाकरिता जिल्ह्यात एक हजार हेक्टरहून अधिक जमिन संपादित करण्यात आली असून, त्यापोटी सुमारे १२०० कोटी रुपयांचा मोबदलाही शेतकºयांना देण्यात आला आहे. परंतु अजूनही सात ते आठ हेक्टर क्षेत्र रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात आलेले नाही. जादा मोबदल्याच्या मागणीच्या मुद्द्यावरून सदर जागा अद्यापही मिळू शकलेली नाही. चर्चेअंति यातून सकारात्मक मार्ग काढता येईल, असे जिल्हाधिकाºयांनी शेतकºयांना सांगितले. मात्र शेतकरी जादा मोबदल्याच्या मागणीसाठी अडून बसल्याने संबंधित शेतकरी आता विभागीय आयुक्तांचा दरवाजा ठोठविण्याच्या तयारीत आहेत.
जालना येथे अधिकच्या मोबदल्याचा दावा
जालना येथेही काही शेतकºयांच्या द्राक्षबागा महामार्गात गेल्या आहेत. त्यांना तेथील प्रशासनाने प्रतिझाड ११ हजार रु पये दराने मोबदला दिल्याचा या शेतकºयांचा दावा असून, इकडे साडेचार ते साडेपाच हजार रुपये दराने मोबदला मिळाल्याची त्यांची तक्र ार आहे. मोबदला वाढवून मिळावा, अशी मागणी या शेतकºयांनी बैठकीत केली. निर्यात दराच्या निकषाने मोबदला निश्चित केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हा दर मान्य नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.