रुग्णालयात तणावमृतदेह ताब्यात घेण्यास नकार
By admin | Published: September 5, 2015 11:26 PM2015-09-05T23:26:55+5:302015-09-05T23:27:32+5:30
रुग्णालयात तणावमृतदेह ताब्यात घेण्यास नकार
नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीमध्ये गटारीचे तुंबलेले चेंबर साफ करण्यासाठी गेलेले महापालिका कर्मचारी विनोद मारू व खासगी कर्मचारी दीपक माळी यांच्या मृत्यूनंतर मृतदेह ताब्यात घेण्यावरून जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता़ या घटनेनंतर तब्बल दोन तासांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा रुग्णालयातील मयताच्या वारसांची भेट घेऊन घटनेची सखोल चौकशी तसेच वारसांना पालिका सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला़
सातपूर येथील दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईक व मेघवाळ समाजबांधवांनी गर्दी केली होती़ कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत महापालिकेकडे वारंवार निवेदन देऊनही त्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच या दोघांचा बळी गेल्याचा आरोप यावेळी करण्यात आला़ वारसांना जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका मेघवाळ समाजाचे अध्यक्ष सुरेश मारू यांनी घेतली होती़
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले मारू यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.