कांदा अनुदानाबाबत जिल्हा निबंधक अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:44 AM2019-05-10T00:44:04+5:302019-05-10T00:44:20+5:30
नाशिक : राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या अनुदानात जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र ठरले, याबाबत जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने हेच अनभिज्ञ असल्याचे जिल्हाधिकाºयांनी बोलाविलेल्या आढावा बैठकीत स्पष्ट झाले. विशेष म्हणजे जिल्हाधिकाºयांनी दोन महिन्यांपूर्वी-देखील याची माहिती जिल्हा उपनिबंधकांना विचारली होती. त्यावेळीदेखील ते समाधानकारक माहिती देऊ शकले नाहीत, त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी झालेल्या बैठकीत कांदा अनुदानाबाबत माहितीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी जिल्ह्णात १५ डिसेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंत कांदाविक्री केलेल्या शेतकºयांना प्रती क्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला, त्यानुसार जिल्ह्णातील किती शेतकºयांनी प्रस्ताव सादर केले याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी गौतम बलसाने यांना विचारली. त्यावर त्यांनी आजवर दोन लाख ६० हजार शेतकºयांनी अनुदानासाठी अर्ज केल्याचे सांगितले व त्यातील एक लाख ८० हजार प्रस्तावांची छाननी करण्यात आल्याचे बलसाने म्हणाले. जिल्हाधिकाºयांनी त्यांना किती शेतकरी पात्र ठरले याची आकडेवारी विचारली असता, बलसाने यांच्याकडून अद्याप पात्र-अपात्र शेतकरी ठरविले नसल्याचे सांगितले. त्यावर जिल्हाधिकाºयांनी पुन्हा त्यांना पात्र शेतकºयांची माहिती विचारली, परंतु ते देऊ शकले नाही. त्यावर जिल्हाधिकाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जितके अर्ज आले, त्यातून किती शेतकरी पात्र ठरले याची माहिती घेऊन तत्काळ सादर करा, असे आदेशही जिल्हाधिकाºयांनी त्यांना दिले.