दडपशाही न करता सनदशीर मार्गाने दाद मागावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 05:39 PM2018-11-14T17:39:01+5:302018-11-14T17:39:14+5:30

सिन्नर: नाशिक वर्कर्स युनियनने आपल्या मागण्या व्यवस्थापनाकडून मान्य करून घेण्यासठी दडपशाही व आंदोलनाचा मार्ग न स्विकारता कामगार न्यायालयाकडे सनदशीर पद्धतीने दाद मागावी.

Regardless of repression, ask for mercy | दडपशाही न करता सनदशीर मार्गाने दाद मागावी

दडपशाही न करता सनदशीर मार्गाने दाद मागावी

Next

सिन्नर: नाशिक वर्कर्स युनियनने आपल्या मागण्या व्यवस्थापनाकडून मान्य करून घेण्यासठी दडपशाही व आंदोलनाचा मार्ग न स्विकारता कामगार न्यायालयाकडे सनदशीर पद्धतीने दाद मागावी. कामगारांचा संप बेकायदेशीर असून कामावर हजर होण्याचे व्यवस्थापनाने वारंवार केलेले आवाहन झुगारून संप चालूच ठेवण्याचा पवित्रा युनियनने घेतला आहे ही दुर्दैवाची बाब असल्याचे स्पष्टीकरण केटा फार्मा व्यवस्थापनाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
अशा परिस्थितीत आज ना उद्या कंपनी बंद पडून व्यवस्थापनाचे, कामगारांचे, सिन्नर तालुक्याचे आर्थिक व्यवस्थेचे नुकसानच होईल यात दुमत नसल्याचे मतही कंपनीने दिलेल्या पत्रकात व्यक्त केले आहे. कारखान्यात एकूण ९० ते ९५ कामगारांपैकी सध्या ४७ कामगारांनी नाशिक वर्कर्स युनियनचे सभासत्व स्वीकारून पगारवाढीसाठी मागील ७ महिन्यापासून संप पुकारलेला आहे. याबाबत युनियन प्रतिनिधींशी कामगार आयुक्तासमोर व्यवस्थापनाने वेळोवेळी चर्चा केली असल्याचे कारखाना व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. पगार वाढ देणे का शक्य नाही याची कारणेही दिली आहेत. कंपनीच्या मनुष्यबालावरील खर्च सध्या जवळजवळ २० टक्के असून तो २००१ मध्ये फक्त ५ टक्के होता. हाच खर्च आमच्या स्पर्धकांचा ३ ते ५ टक्के असतो असे कंपनीचे म्हणणे आहे. सध्या किमान वेतन १० हजार रुपये असून आमच्या कामगारांचा सरासरी मासिक पगार २२ हजार रुपये असल्याचे कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.
संपावरील कामगार दडपशाहीचा वापर करीत आहे व कामावर येणाऱ्या कर्मचाºयांना कामावर न येण्याचे धमकावून कंपनीचे कामकाज बंद पाडू पाहत असल्याचा आरोप कारखाना व्यवस्थापनाने केला आहे. कामगारांनी पोलिसांवर केलेले आरोप चुकीचे असल्याचेही कारखाना व्यवस्थापनाने म्हटले आहे.
कंपनीचे अस्तित्व टिकवण्यासाठी कंपनीचे उत्पादन चालू ठेवणे गरजेचेच आहे.

Web Title: Regardless of repression, ask for mercy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप