येवल्यात विभागीय टेनिस स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:10 AM2018-10-26T00:10:13+5:302018-10-26T00:12:47+5:30
येवला : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक व महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला यांच्या संयुक्त विद्यमाने १७ व १९ वर्ष वयोगट शालेय विभागस्तर स्पर्धांचे आयोजन नवभारत क्र ीडा मैदान येथे करण्यात आले.

अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे टेनिसपटू श्रीकांत पारेख होते. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ टेनिस खेळाडू सुशील गुजराथी, डॉ. स्वप्निल शहा, क्रीडा कार्यालयाचे प्रकाश पवार आदी उपस्थित होते.
सदर स्पर्धेत नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यांतील १७ आणि १९ वर्ष वयोगटातील ४० खेळाडू विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेतून प्रत्येकी पाच खेळाडूंची निवड राज्यस्तरासाठी करण्यात आली. स्पर्धेसाठी खेळाडू, पालक वर्ग व येवला शहरातील टेनिसप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर स्पर्धेचे यशस्वी आयोजन शिरीष नांदुर्डीकर यांनी केले. किरण कुलकर्णी व स्वप्निल बाकळे यांनी परिश्रम घेतले. राज्यस्तरावर निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे १९ वर्षं वयोगट, तन्मय नांदुर्डीकर, येवला, (नाशिक), रयान सय्यद नाशिक, आदित्य मेहता, नाशिक, यश पाटील, जळगाव, प्रणय पाटील यांचा समोवश आहे.