प्रादेशिक परिवहन कार्यालयातील काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:15 AM2021-05-06T04:15:47+5:302021-05-06T04:15:47+5:30
आदेशानुसार बंद करण्यात आली असून, फक्त अत्यावश्यक कामांनाच प्राधान्य देण्यात आले आहे. आरटीओ कार्यालयाच्या आवारात विनाकारण येणाऱ्यांना मनाई करण्यात ...
आदेशानुसार बंद करण्यात आली असून, फक्त अत्यावश्यक कामांनाच प्राधान्य देण्यात आले आहे.
आरटीओ कार्यालयाच्या आवारात विनाकारण येणाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने निर्बंध लागू करत शासकीय कार्यालयांना सूचना व निर्देश जारी केले त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयात काम सुरू आहे. त्यानुसार नवीन वाहन अत्यावश्यक आपत्कालीन सेवेसाठी वापरली जाणारी रुग्णवाहिका, ऑक्सिजन सिलिंडर, टँकर वाहने योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण काम सुरू आहे तर वाहनविषयक कामात वाहन हस्तांतरण करणे, कर्जबोजा नोंद घेणे, कमी करणे ही कामे बंद असून केवळ प्रलंबित प्रकरणे पूर्ण केेली जात आहेत. नव्याने कामकाजाबाबत अर्ज स्वीकारले जात नाही. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने सोडून इतर वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण काम बंद आहे. शिकाऊ आणि पक्के लायसन्स काढण्याचे काम पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आले असून, अनुज्ञप्तीविषयी कामे त्यात दुय्यम अनुज्ञप्ती जारी करणे, नूतनीकरण सारथी प्रणालीवर प्राप्त व पूर्तता करत असतील अशी प्रलंबित प्रकरणे पूर्ण केली जाणार आहेत. मात्र, नव्याने कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने संसर्ग रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामात बदल करून वाहनांसंबंधी सर्व कामे बंद ठेवण्याबाबत आदेश जारी केल्याने वाहनांसंबंधी कामासाठी नागरिकांना शासनाच्या पुढील आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.