शिवसेना नगरसेवकांच्या गटाची नोंदणी
By Admin | Published: March 8, 2017 12:28 AM2017-03-08T00:28:08+5:302017-03-08T00:28:20+5:30
नाशिकरोड : मनपामध्ये निवडून आलेल्या शिवसेनेच्या ३५ नगरसेवकांच्या गटाची मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्यात आली.
नाशिकरोड : मनपामध्ये निवडून आलेल्या शिवसेनेच्या ३५ नगरसेवकांच्या गटाची मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्यात आली. मनपा निवडणुकीत सत्तेचे स्वप्न उराशी बाळगलेल्या शिवसेनेचे ३५ नगरसेवक निवडून आले. तर भाजपाचे ६६ नगरसेवक निवडून येत त्यांनी एकहाती सत्ता हस्तगत केली आहे. भाजपा नगरसेवकांची गटाची नोंदणी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात झाली होती. शिवसेनेने मनपामध्ये शिवसेना गटनेतेपदी नगरसेवक विलास शिंदे यांची नियुक्ती केली आहे. मंगळवारी दुपारी शालीमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात नवनिर्वाचित शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, अॅड. शिवाजी सहाणे आदिंच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. तेथुन सर्व पदाधिकारी, नगरसेवक वाहनातुन विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले. यावेळी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी सर्व ३५ नगरसेवकांची नावे वाचुन ओळख करून घेतली. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांनी ‘जय महाराष्ट्र’ म्हणत स्वत:ची ओळख करून दिली. त्यानंतर डवले यांनी मनपातील शिवसेना गटाची नोंदणी केली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, शिवसैनिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)