ए्कट्या नाशिक जिल्ह्यातूुन २६ हजार द्राक्षबागांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:36 AM2020-12-04T04:36:44+5:302020-12-04T04:36:44+5:30

युरोपीय देशांमध्ये साधारणत: १५ जानेवारीनंतर द्राक्ष निर्यात सुरू होते. यासाठी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बागांची आगाऊ नोंदणी करावी लागते. ...

Registration of 26,000 vineyards from Nashik district alone | ए्कट्या नाशिक जिल्ह्यातूुन २६ हजार द्राक्षबागांची नोंदणी

ए्कट्या नाशिक जिल्ह्यातूुन २६ हजार द्राक्षबागांची नोंदणी

Next

युरोपीय देशांमध्ये साधारणत: १५ जानेवारीनंतर द्राक्ष निर्यात सुरू होते. यासाठी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बागांची आगाऊ नोंदणी करावी लागते. यावर्षी आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातून २६ हजार ८९८ बागांची नोंदणी करण्यात आली आहे. २९ नोव्हेंबरपर्यंत असलेली द्राक्षबाग नोंदणीची मुदत वाढवून आता ती २० डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे. सन २०१९-२० च्या हंगामात राज्यात ३३४५१ द्राक्षबागांची नोंदणी करण्यात आली होती. यावर्षी नाशिकपाठोपाठ सांगली जिल्ह्यात नोंदणी झाली आहे.

चौकट----

महाराष्ट्रातून ३२,२३१, तर कर्नाटकमधून २८३ अशा देशातून एकूण ३२,४१४ द्राक्षबागांची नोंदणी झाली आहे.

चौकट ----

जिल्हानिहाय झालेली द्राक्षबागांची नोंदणी

नाशिक -२६,८९८ , सांगली -२,९३३ , पुणे १,१४९, सातारा ४६७, नगर -३४७, उस्मानाबाद -१३०, सोलापूर ११०, लातूर १०७, बुलढाणा -७३, जालना -१६, बीड -१

Web Title: Registration of 26,000 vineyards from Nashik district alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.