ग्रामीण भागात ६४८ खासगी रुग्णालयांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:34 AM2021-01-13T04:34:51+5:302021-01-13T04:34:51+5:30
------ ...तर रुग्णालयांचा परवाना रद्द आरोग्य सेवा पुरविणाऱ्या रुग्णालयांनी नर्सिंग अॅक्टनुसार परवाना घेतल्यानंतर कबूल केलेल्या रुग्ण सेवा व सुविधा ...
------
...तर रुग्णालयांचा परवाना रद्द
आरोग्य सेवा पुरविणाऱ्या रुग्णालयांनी नर्सिंग अॅक्टनुसार परवाना घेतल्यानंतर कबूल केलेल्या रुग्ण सेवा व सुविधा देणे बंधनकारक आहे. त्यात कसूर केल्यास सदरचा परवाना रद्द करण्याचे अधिकार आरोग्य यंत्रणेला कायद्यानुसार बहाल करण्यात आले आहेत.
------
गेल्या वर्षात ६२४ रुग्णालयांची नोदणी
गेल्या वर्षी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ६२४ खासगी रुग्णालयांनी नोंदणी केली. या रुग्णालयांनी त्यांच्याकडे प्रसूतीसाठी किती खाटा आहेत व अन्य रुग्णांवर उपचारासाठी किती खाटा आहेत, याची माहिती त्यात नमूद केली आहे. या खाटांची आरोग्य विभागाकडून खातरजमा करण्यात आली आहे.
-----
खासगी रुग्णालयांची नियमित तपासणी
जिल्ह्यात आरोग्य सेवा पुरविणाऱ्या खासगी रुग्णालयांची तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत दरवर्षी तपासणी केली जाते व ज्या आधारावर त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे, त्याची पूर्तता होते किंवा नाही, याची पाहणी केली जाते.
- डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी
-------------------------