येवल्यात शेतमाल लिलावासाठी नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:14 AM2021-05-23T04:14:32+5:302021-05-23T04:14:32+5:30

जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याबरोबर झालेल्या बैठकीतील सूचनेप्रमाणे कोरोनाकाळात बाजार समितीचे लिलाव कामकाज पूर्ववत सुरू करण्यासाठी सोमवारी (दि.२४) ...

Registration for Agricultural Commodity Auction in Yeola | येवल्यात शेतमाल लिलावासाठी नोंदणी

येवल्यात शेतमाल लिलावासाठी नोंदणी

Next

जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याबरोबर झालेल्या बैठकीतील सूचनेप्रमाणे कोरोनाकाळात बाजार समितीचे लिलाव कामकाज पूर्ववत सुरू करण्यासाठी सोमवारी (दि.२४) मुख्य आवार येवला येथे ५०० (ट्रॅक्टर) व उपबाजार अंदरसुल येथे ३०० (ट्रॅक्टर) कांदा लिलावासाठी (फक्त ट्रॅक्टर) वाहनांची नोंदणी रविवारी मोबाइलवर केली जाणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यावर सदर मोबाइल बंद करण्यात येतील. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच सोमवारी (दि. २४) बाजार समितीच्या गेटवर नंबरची खात्री करून सकाळी ६ वाजेनंतर प्रवेश दिला जाणार आहे.

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी सदर दिवशी सकाळी ६ ते ९.३० पर्यंत वाहन आणावे. नंतर आलेल्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. शेतकरी बांधवांनी बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य प्रशासक पवार, सचिव

कैलास व्यापारे व प्रशासकीय मंडळ सदस्यांनी केले आहे.

Web Title: Registration for Agricultural Commodity Auction in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.