नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचार्यांचे उद्यापासून लेखणीबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 08:33 PM2020-09-29T20:33:44+5:302020-09-30T01:04:57+5:30
सिन्नर: नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या मागण्यांंसंदर्भात शासनाकडे मागील 2 ते 3 वर्षापासून निवेदन सादर करण्यात आलेले आहेत. ...
सिन्नर: नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या मागण्यांंसंदर्भात शासनाकडे मागील 2 ते 3 वर्षापासून निवेदन सादर करण्यात आलेले आहेत. मात्र शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेच्यावतीने उद्या गुरुवारपासून (दि.1) बेमुदत लेखणीबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
नोंदणी व मुद्र्रांक विभागातील सर्व संवर्गातील रखडलेल्या पदोन्नत्या तात्काळ करणे, कोरोना महामारी मध्ये मुद्रांक विभागातील सर्व कर्मचारी हे शासनाचे 30% उपस्थितीचे आदेश असताना 100 % उपस्थितीमध्ये काम करत आहेत तथापि विभागातील कर्मचा-यांना मागणी करुन सुद्धा जीवन सुरक्षा वीमा कवच लागू केलेले नाही. विभागामध्ये (कोवीड-19) या आजाराने ंआत्तापर्यंत 06 अधिकारी व कर्मचार्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्यांना विमाकवच द्यावे, तुकडेबंदी कायद्याने होणार्या कारवाया, रेरा कायद्यामध्ये होणार्या कार्यवाही, सह दुय्यम निबंधक वर्ग -2 व दुय्यम निबंधक श्रेणी -1 संवर्गाचे एकत्रीकरण करणेबाबत, हार्डवेअर साहीत्य बाबत, आयकर विवरणपत्र, पोलीस विभाग व इतर विभागाकडून मागणी केल्या जाणार्या माहिती बाबत, आय-सरीता, ई-म्युटेशन, ग्रास व आधार सर्व्हर इत्यादी मागण्याबाबत तसेच शासनाकडून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये कोणत्याही सोयी सहसचिव सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत.
या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी यापुर्वीच घोषीत केल्याप्रमाणे गुरुवारपासून पासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन पुकारण्यात आले असल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकान्वये देण्यात आली आहे. पत्रकावर संघटनेचे अध्यक्ष गजानन खोत, कार्याध्यक्ष अशोकराव चव्हाण, सचिव सागर पवार संस्थापक सल्लागार गोपीनाथराव कोळेकर, उपाध्यक्ष संतोष तायडे, सुधाकर निमजे, अनिल देशमुख, सुनिल वाडेवाले, अर्जुन वडये, अर्जुन वडये, राजेंद्र डोईफोडे, सुनिल पवार देवा चव्हाण, कल्याण कुलकर्णी, अनिल जगधने,संध्या रामटेके आदींची नावे आहेत.