लसीकरण नोंदणीला प्रारंभ होताच एका मिनिटात नोंदणी बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:14 AM2021-05-13T04:14:15+5:302021-05-13T04:14:15+5:30

नाशिक : लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला १ मेपासून सुरुवात झाली आहे. त्यामध्ये १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जाणार ...

Registration closes within a minute of vaccination registration! | लसीकरण नोंदणीला प्रारंभ होताच एका मिनिटात नोंदणी बंद !

लसीकरण नोंदणीला प्रारंभ होताच एका मिनिटात नोंदणी बंद !

googlenewsNext

नाशिक : लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला १ मेपासून सुरुवात झाली आहे. त्यामध्ये १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. या लसीकरण मोहिमेची नोंदणी प्रक्रिया २८ एप्रिलपासून सुरू झाली आहे. मात्र, नोंदणी करताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. प्रारंभीच्या टप्प्प्यात आलेल्या अडचणींवर तंत्रज्ञांनी मार्ग शोधले. त्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही नोंदणी काही प्रमाणात तरी सुरळीत होती. मात्र, गत चार-पाच दिवसांपासून समस्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांच्या तक्रारीदेखील प्रचंड वाढल्या आहेत. काही वेळा तर ७ सात वाजता नोंदणी करायला प्रारंभ केल्यानंतरच्या अवघ्या दहा सेकंदांत बुकचा संदेश येतो, तर काही वेळा नोंदणीसाठी बुकिंगच दिसत नाही. अशा विविध प्रकारच्या समस्यांमुळे तरुणाई त्रस्त आहे.

शासनाच्या कोविन या पोर्टलवर नोंदणी करताना सुरुवातीला मोबाइल नंबर रजिस्टर करावा लागतो. त्यानंतर एक ओटीपी त्या मोबाइल नंबरवर पाठविला जातो. मात्र, हा ओटीपी येत नसल्याचे समोर आले आहे, तसेच अनेक युजर्सनी साइट ओपन होत नसल्याच्यादेखील तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, तांत्रिक अडचणीनंतरही पहिल्या एका तासात कोविन ॲपवर १८ वर्षे वयावरील ३५ लाख लोकांनी लसीसाठी नोंदणी केली होती. मात्र, त्यानंतर नवीन नियमानुसार आता नागरिकांना दुसऱ्या दिवसाची नोंदणी आदल्या दिवशी करावी लागत आहे. अशा परिस्थितीत जर बुकिंगच होत नसेल तर नागरिकांची ओरड होणे संयुक्तिकच आहे. प्रारंभी नोंदणी प्रक्रिया कोविन अ‍ॅपवर सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये कोविन अ‍ॅपचा सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती समोर आली. सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी यासंदर्भातील तक्रार नोंदविली असून, स्क्रीनशॉट पोस्ट केले जात आहेत. ट्विटरवर वेटिंग फॉर ओटीपी, नो ओटीपी, स्लॉट, ओटीपीज, अपॅाइंटमेंट असे ट्रेंड, सुरू आहेत. आरोग्य सेतू, तसेच कोविन अ‍ॅपवरून नोंदणी केली तरी मूळ नोंदणीसाठी कोविनच्या अ‍ॅपवरच नोंदणी करणाऱ्यांना रिडायरेक्ट केले जात असल्याने कोट्यवधी युजर्स एका वेळी नोंदणीसाठी आल्याने सर्व्हर क्रॅश झाले होते.

इन्फो

पोर्टलमध्ये सुधारणा तरीही समस्या

दररोज एक कोटी नोंदणी या पोर्टलवर स्वीकारली जाणार आहे. यासोबतच दररोज ५० लाख लोकांच्या लसीची नोंद होऊ शकते. त्यामुळे नोंदणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे या पोर्टलमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. मात्र, सुधारणांनंतरही समस्या कायम असल्यानेच नागरिकांकडून तक्रारीचा सूर वाढला आहे.

इन्फो

शहरात बुकिंग होत नाही, ग्रामीणला नोंदणी फुल

लसीकरणासाठी संकेतस्थळावर किंवा अ‍ॅपवर जाऊन आगाऊ नोंदणी करणे बंधनकारक आहे; परंतु लसीकरणाचे ठिकाण बंधनकारक नसल्यामुळे जिल्हा, तालुक्यातील असलेल्या केंद्रांवर जिल्ह्याबाहेरील नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. या गर्दीत स्थानिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. या केंद्रांवर आगाऊ नोंदणी केलेल्या जिल्ह्याबाहेरील नागरिकांची गर्दी होत असल्याने ग्रामीण भागात लसीकरण करण्याचे उद्दिष्ट साध्य होत नसल्याचे दिसून आले आहे.

इन्फो

युवापैकी अवघे १४ हजारांचे लसीकरण

जिल्ह्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सुमारे १७ लाख नागरिकांपैकी अवघ्या १४ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. म्हणजे जिल्ह्यातील लसीकरणाची संख्या एक टक्केदेखील पूर्ण झालेली नाही. त्यात या आठवड्यात युवा नागरिकांचे लसीकरण पूर्णच बंद झाले आहे. त्यामुळे युवा वर्गाचा लसीकरणाबाबतचा आक्रोश अधिकच वाढला आहे.

---------------------

( ही डमी आहे. )

Web Title: Registration closes within a minute of vaccination registration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.