दिव्यांग मतदारांची अॅपद्वारे नाव नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 11:45 PM2019-10-06T23:45:44+5:302019-10-06T23:46:50+5:30
पंचवटी : महाराष्ट्र समाजसेवा संघ संचलित श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय कर्णबधिर विद्यार्थ्यांची शाळेत सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी दिव्यांग मतदारांना नावनोंदणी करण्यासाठी पीडब्ल्यूडी अॅपबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : महाराष्ट्र समाजसेवा संघ संचलित श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय कर्णबधिर विद्यार्थ्यांची शाळेत सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी दिव्यांग मतदारांना नावनोंदणी करण्यासाठी पीडब्ल्यूडी अॅपबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
लेले विद्यालयात झालेल्या दिव्यांग मतदार मार्गदर्शन शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण अधिकारी मंगेश वानखेडे, विजय पाटील, शाळेच्या मुख्याध्यापक वृषाली घारपुरे आदी उपस्थित होते.
यावेळी वानखेडे यांनी उपस्थित दिव्यांग मतदारांना मार्गदर्शन करून त्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात दहा हजारांहून अधिक दिव्यांग व्यक्तींची मतदारयादीत नोंदणी झाली आहे. अजून बऱ्याच दिव्यांग व्यक्तींची नोंदणी बाकी आहे. दिव्यांग व्यक्तींना पीडब्ल्यूडी अॅपवरून मतदार नोंदणी करणे सहज सुलभ होणार आहे. सदर अॅपद्वारे नोंदणी केल्यास दिव्यांगांना मतदानाच्या दिवशी व्हीलचेअर किंवा त्यांना ने-आण करण्यासाठी वाहन किंवा इतर सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. त्यामुळे ते मतदानाचा हक्क बजावू शकतील. दिव्यांग स्वत: अॅपद्वारे नोंदणी करू शकले नाही. त्यांच्यासाठी त्या त्या विभागातील शाळांमध्ये मतदान मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी संपर्क साधल्यास त्यांचीही नोंदणी करता येईल सर्व दिव्यांग व्यक्तींनी पीडब्ल्यूडी अॅपच्या माध्यमातून नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुराधा येलनूरकर यांनी केले.