जिल्ह्यातील १ लाखाहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:12 AM2020-12-26T04:12:26+5:302020-12-26T04:12:26+5:30
कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या यांत्रिकीकरणांसह विविध योजनांसाठी आता एकच अर्ज करावा लागणार आहे. शेतकऱ्यांना सर्व सुलभ व्हावे यासाठी ...
कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या यांत्रिकीकरणांसह विविध योजनांसाठी आता एकच अर्ज करावा लागणार आहे. शेतकऱ्यांना सर्व सुलभ व्हावे यासाठी महाडीबीटी पोर्टल तयार करण्यात आले असून, शेतकरी योजना या सदराखाली सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाव्दारे दिला जाणार आहे. यासाठी अर्ज भरण्यापासून ते थेट योजनेचा लभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीयप्रणाली विकसित करण्यात आली आहे. शेतीशीनिगडित विविध बाबींसाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी अर्ज करता येणार आहे.
३१ डिसेंबरपर्यंत भरण्यात आलेल्या अर्जांतून लॉटरी पध्दतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
चौकट -
मोबाइल क्रमांक आधारला लिंक करणे आवश्यक
कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधारकार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. https://mahadbtmahait.gov.in/ या लिंकवर गेल्यानंतर शेतकरी योजना हा पर्याय निवडून तेथे आपली माहिती भरावी. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा ज्या वापरकर्त्यांकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी. त्यानंतर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलवर नमूद करून त्यांना अर्ज करता येईल.
चौकट -
ट्रॅक्टर, ठिबक, यांत्रिकीकरण , फलोत्पादन, कांदाचाळ आदींसह कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करता येणार आहे. एकाच अर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळणार आहे. कृषी विभागाने निश्चित केलेल्या उद्दिष्टानुसार लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे.
कोट -
कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आता एकच अर्ज करावा लागणार असल्याने शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज सादर केलेले नाहीत त्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत व योजनांचा लाभ घ्यावा. कृषी विभागाला मिळणाऱ्या उद्दिष्टानुसार लॉटरी पध्दतीने लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे. - कैलास शिरसाट, कृषी उपसंचालक
कोट -
कृषिविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी आता वेगवेगळे अर्ज करण्याची गरज नसल्याने कागदपत्र जुळवाजुळव करण्याचा ताण बऱ्यापैकी कमी झाला असून, शेतकऱ्यांची सोय झाली आहे. मात्र आता आपला नंबर कधी लागणार याची चिंता आहे. - अशोक दौंडे, शेतकरी