द्राक्षनिर्यातीसाठी साडेतीन हजार प्लॉटची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 01:53 AM2018-11-18T01:53:20+5:302018-11-18T01:53:51+5:30
युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य राष्ट्रांमध्ये द्राक्षांची निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या द्राक्ष प्लॉट नोंदणी प्रक्रियेत आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, या प्रक्रि येअंतर्गत यावर्षात आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे २२९५ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबांगांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य राष्ट्रांमध्ये द्राक्षांची निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या द्राक्ष प्लॉट नोंदणी प्रक्रियेत आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, या प्रक्रि येअंतर्गत यावर्षात आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे २२९५ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबांगांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी अद्याप द्राक्षबागांच्या नोंदणीचे प्रमाण कमी असले तरी डिसेंबरअखेरपर्यंत मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीही द्राक्षबांगांची नोंदणी होण्याची अपेक्षा कृषी विभागाला आहे.
निर्यातक्षम रेसिड्यू फ्री द्राक्षांसाठी कृषी विभागाकडे द्राक्ष बागांची नोंदणी आवश्यक
असून, यावर्षी १५ आॅक्टोबरपासून या प्रक्रियाला सुरुवात झाली
आहे. या प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आतापर्यंत सुमारे ३
हजार ४९९ प्लॉटची नोंदणी झाली आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरअखेरपर्यंत ३० हजार ४२७ प्लॉट इतके होते. त्यातुलनेत यावर्षी नोंदणी करणाºया उत्पादकांनी संख्या कमी असली तरी डिसेंबरपर्यंत हे प्रमाण वाढण्याची अपेक्षा कृषी विभागाला असून यावर्षी शेतकºयांना ३१ डिसेंबरपर्यंत द्राक्षनिर्यातीसाठी त्यांच्या प्लॉटची नोंदणी करता येणार
आहे.
गेल्यावर्षी नाशिक जिल्ह्णातून सुमारे एक लाख दोन हजार ८१६ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती.
याच प्रमाणात यावर्षीही निर्यातीचा टप्पा गाठण्यासाठी आणखी २६ ते २७ हजार प्लॉटची नोंदणी होणे आवश्यक
असून, शेतकºयांनी ३१ डिसेंबरपर्यंत द्राक्ष प्लॉटची नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय पडवळ यांनी केले आहे.
अशी करता येईल प्लॉट नोंदणी द्राक्ष उत्पादक शेतकºयांना त्यांच्या बागेतील द्राक्षांची निर्यात करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा गावातील कृषी सहायक यांच्याकडे प्लॉटची नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी शेतकºयांना द्राक्षबागेचा सातबारा व खाते उतारा व प्रत्येक प्लॉटसाठी ५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.