समाज कल्याण कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:11 AM2021-06-17T04:11:32+5:302021-06-17T04:11:32+5:30

नाशिक : समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष उपक्रमांतर्गत राज्यातील समाज कल्याण विभागातील ...

Regular pay scale for social welfare employees | समाज कल्याण कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी

समाज कल्याण कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी

Next

नाशिक : समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष उपक्रमांतर्गत राज्यातील समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना नियमित वेतन श्रेणीचा लाभ देण्यात आला आहे, तर काही निलंबित कर्मचाऱ्यांची सेवादेखील सर्व कार्यवाहीनंतर पुनर्स्थापित करण्यात आली आहे.

समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या राज्यातील शासकीय निवासी शाळेतील सहायक शिक्षक व प्रयोगशाळा सहायक या पदावरील ३५ कर्मचाऱ्यांचा नियमित वेतन श्रेणीचा प्रश्न निकाली काढण्यात आला असून, त्यातील २१ कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी नुकतेच या संदर्भातील निर्णय घेतले आहेत. सर्व कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून ठोक वेतनावर काम करत असून, त्यांच्या सेवादेखील शासकीय नियमानुसार पूर्ण झालेल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे. उर्वरित १४ कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करावी, जेणेकरून त्यांना ही लवकरच नियमित वेतनश्रेणी मंजूर करता येईल. असे आवाहनदेखील नारनवरे यांनी केले आहे.

समाज कल्याण विभागातील राज्यातील कार्यालयांमध्ये विविध कारणांनी निलंबित असलेल्या मुख्याध्यापक, गृहपाल, प्रमुख लिपिक, सहायक ग्रंथपाल या संवर्गाच्या ११ कर्मचाऱ्यांच्या सेवादेखील पुनर्स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचारी वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे.

समाज कल्याण विभागाचे कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी कौशल्य विकास, झिरो पेंडन्सी, विविध संवर्गाचे प्रशिक्षण, यासारखे नवनवीन उपक्रम राबविण्यात येत असल्याचे विभागाकडून कळविण्यात आले आहे.

Web Title: Regular pay scale for social welfare employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.