गणरायाच्या स्वागताची जिल्ह्यात जोरदार तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 11:35 PM2017-08-24T23:35:07+5:302017-08-25T00:05:21+5:30
नाशिक : विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील गणेशभक्त सज्ज झाले असून, बाजारपेठ गजबजली आहे. घरगुती व सार्वजनिक मंडळाची गणेशाच्या आरसासाठी तयारी सुरू आहे.
नाशिक : विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील गणेशभक्त सज्ज झाले असून, बाजारपेठ गजबजली आहे. घरगुती व सार्वजनिक मंडळाची गणेशाच्या आरसासाठी तयारी सुरू आहे.
कसबे सुकेणे शहर व परिसरात गणेशाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. कसबे सुकेणेच्या बुधवारच्या आठवडे बाजारापासून बाजारपेठेत गणेशमूर्ती व पूजा विधी साहित्याची दुकाने थाटली गेली आहे. आरससाठी लागणाºया आकर्षक देशी व चिनी लायटिंग, मखर बाजारात दाखल झाले आहेत. कसबे सुकेणे शहरात मेनरोड, बसस्थानक आदी भागात गणेशभक्त गर्दी करत आहेत. यंदा वरुणराजाची मेहेरबानी असल्याने गणरायाच्या स्वागतासाठी ग्रामीण भागातही उत्साह दिसून येत आहे.
गणेश पूजनासाठी मुहूर्त
घरी गणेशमूर्ती आणण्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची जरुरी नाही. श्रीगणेशाची स्थापना व पूजन करण्यासाठी २५ आॅगस्ट रोजी प्रात:कालपासून मध्यान्ह समाप्तीपर्यंत म्हणजे, दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत शुभ वेळ असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या वर्षी पाचव्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याच्या दिवशी मंगळवार येत आहे. तरी त्याच दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन करावे. गणेशमूर्ती विसर्जनाचा आणि मंगळवारचा काहीही संबंध नसल्याचेही सोमण यांनी स्पष्ट केले.