जनसहभागातून मंदिराचा जीर्णाेद्धार

By admin | Published: May 23, 2017 12:54 AM2017-05-23T00:54:19+5:302017-05-23T00:54:49+5:30

नाशिक : आगर टाकळी येथील मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी मठ येथील ३८४ वर्ष जुन्या गोमय मारुती मंदिर जीर्णाेद्धाराचा शुभारंभ सोमवारी (दि .२२) हाराज यांच्या हस्ते करण्यात आला.

Rehabilitation of the temple from the people's share | जनसहभागातून मंदिराचा जीर्णाेद्धार

जनसहभागातून मंदिराचा जीर्णाेद्धार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आगर टाकळी येथील मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी मठ येथील ३८४ वर्ष जुन्या गोमय मारुती मंदिर जीर्णाेद्धाराचा शुभारंभ सोमवारी (दि. २२) अमळनेर येथील प्रसाद महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.  यावेळी बोलताना प्रसाद महाराज यांनी, मठाचे सामर्थ्य विशद करताना सरकारकडून तसेच भक्तांच्या जनसहभागातून या मंदिराचा जीर्णाेद्धार व्हावा, अशी भावना व्यक्त केली. तसेच अमळनेर येथील विठ्ठल रुक्मिणी संस्थानातर्फे नव्याने उभारल्या जाणाऱ्या गोमय मारुती मंदिराला सोन्याचा कळस देणार असल्याची घोषणा केली. सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. दरम्यान, भूमिपूजनाच्या धार्मिक सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी मंदिराच्या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. ढवळे, अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे, सुधीर शिरवाडकर, जोतिराव खैरनार, प्रकाश पवार, विजया माहेश्वरी, दिलीप कैचे यांच्यासह भाविक उपस्थित होते.
संपूर्ण भारतभरात विविध ३०० हून अधिक मंदिरे साकारणारे राजू परदेशी यांच्याकडून या मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली. संस्थानचे विश्वस्त जोतिराव खैरनार यांनी यावेळी वर्षभरात मंदिराचे काम पूर्णत्वास येईल, अशी माहिती दिली. जीर्णाेद्धार सोहळ्यास उपस्थित असलेल्या भाविकांकडून मंदिराच्या जीर्णाेद्धारासाठी देणगी देण्यात आली आणि देणगीदारांना प्रसाद महाराज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
 

Web Title: Rehabilitation of the temple from the people's share

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.