सर्व स्तरावरही ‘रेकी’ तंत्र उपयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 10:30 PM2019-01-13T22:30:36+5:302019-01-14T00:51:29+5:30
जीवनातील संधी आणि आव्हानांसोबत जीवनातले ताणतणाव वाढल्याचे आपल्याला दिसून येते. आत्यंतिक गतिमानता आणि स्पर्धेमुळे येणारे हरवलेपण, एकटेपण, नैराश्य या आधुनिक जीवनातील समस्या झाल्या आहेत. त्यातूनच मग हाय ब्लडप्रेशर, डायबेटिस, हृदयविकार यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असून, अशा परिस्थितीत ‘रेकी’ या तंत्राच्या माध्यमातून केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आणि भावनिक स्तरावरसुद्धा प्रभावीपणे काम करून विविध आजारांपासून मुक्ती मिळू शकते, असा विश्वास रेकीतज्ज्ञ विपुल खर्डीकर यांनी व्यक्त केला.
नाशिक : जीवनातील संधी आणि आव्हानांसोबत जीवनातले ताणतणाव वाढल्याचे आपल्याला दिसून येते. आत्यंतिक गतिमानता आणि स्पर्धेमुळे येणारे हरवलेपण, एकटेपण, नैराश्य या आधुनिक जीवनातील समस्या झाल्या आहेत. त्यातूनच मग हाय ब्लडप्रेशर, डायबेटिस, हृदयविकार यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असून, अशा परिस्थितीत ‘रेकी’ या तंत्राच्या माध्यमातून केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आणि भावनिक स्तरावरसुद्धा प्रभावीपणे काम करून विविध आजारांपासून मुक्ती मिळू शकते, असा विश्वास रेकीतज्ज्ञ विपुल खर्डीकर यांनी व्यक्त केला.
नाशिक सेवा समितीतर्फे शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात विपुल खर्डीकर यांनी ‘रेकी’ तंत्राचा उगम आणि उचरा पद्धती उपस्थितांना समजावून सांगतानाच या चिकित्सा पद्धतीचे फायदेही पटवून दिले. व्यासपीठावर ब्रिजलाल धूत, जगदीश काबरा, महावीर प्रसाद मित्तल, किसन खर्डीकर, नेमीचंद पोद्दार आदी उपस्थित होते. ते म्हणाले, तणाव हलका करण्यासाठी रेकी हे तंत्र फार प्रभावी आणि सोपी पद्धती आहे. यात शरीरातील आध्यात्मिक ऊर्जा केंद्राबाबत चक्रांबाबत उल्लेख केलेला आहे. रेकीच्या रोज सरावाने शरीर, मन, भावना, आध्यात्मिक पातळीवर चांगला परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.