ढेकू सरपंचांवरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 06:21 PM2018-09-25T18:21:02+5:302018-09-25T18:21:30+5:30
ढेकू खुर्दच्या सरपंच ज्योती सूर्यवंशी यांच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या नऊपैकी सहा सदस्यांनी अविश्वास ठरावासाठीचा दाखल केलेला प्रस्ताव सहा विरु द्ध तीन मतांनी फेटाळण्यात आला; मात्र उपसरपंच बळीराम भीमा चव्हाण यांच्यावरील अविश्वास मंजूर झाला.
नांदगाव : ढेकू खुर्दच्या सरपंच ज्योती सूर्यवंशी यांच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या नऊपैकी सहा सदस्यांनी अविश्वास ठरावासाठीचा दाखल केलेला प्रस्ताव सहा विरु द्ध तीन मतांनी फेटाळण्यात आला; मात्र उपसरपंच बळीराम भीमा चव्हाण यांच्यावरील अविश्वास मंजूर झाला. ग्रामपंचायत कार्यालयात निवासी नायब तहसीलदार मीनाक्षी बैरागी व नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांच्या उपस्थितीत सरपंच ज्योती सूर्यवंशी व उपसरपंच बळीराम चव्हाण यांच्यावरील अविश्वास ठरावावरील विशेष सभा झाली. वैशाली कांतिलाल राठोड, चतुराबाई वसंत सूर्यवंशी, सरलाबाई वाल्मीक सूर्यवंशी, भामाबाई भागीनाथ गायके, मोतीलाल कारभारी राठोड, नारायण बाळा सूर्यवंशी या सदस्यांनी हा अविश्वास आणला होता. ठरावावरील चर्चेच्या वेळी महिला सरपंचांवर अविश्वास आणताना तीन चतुर्थांश मतांची आवश्यकता असल्याने तांत्रिकदृष्ट्या आवश्यक तेवढा कोरम पूर्ण होऊ न शकल्याने हा ठराव पिठाधिकाऱ्यांनी तो फेटाळला; मात्र उपसरपंचांवरील अविश्वास प्रस्ताव मात्र मंजूर झाला. सरपंच ज्योती सूर्यवंशी यांच्या समर्थकांनी ठराव फेटाळल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
——————————
नांदगाव तालुक्यातील ढेकू येथील सरपंच ज्योती सूर्यवंशी यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यावर आनंद व्यक्त करताना भाऊसाहेब सूर्यवंशी व ज्योती सूर्यवंशी यांच्यासह समर्थक. (२५ ढेकू)