डॉक्टरचा रुग्णावर उपचारास नकार

By Admin | Published: May 22, 2017 02:38 AM2017-05-22T02:38:37+5:302017-05-22T02:38:45+5:30

नाशिक : रुग्णावर रुग्णालयातील डॉ़ दिनेश पवार यांनी उपचारास नकार देत रुग्णांच्या नातेवाइकांसोबत अरेरावी केल्याची घटना शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली़

Rejecting the treatment of the doctor | डॉक्टरचा रुग्णावर उपचारास नकार

डॉक्टरचा रुग्णावर उपचारास नकार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णावर रुग्णालयातील डॉ़ दिनेश पवार यांनी उपचारास नकार देत रुग्णांच्या नातेवाइकांसोबत अरेरावी केल्याची घटना शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली़ यावेळी डॉ़ पवार हे मद्यधुुंद असल्याचा आरोप रुग्णांच्या नातवाइकांनी केला असून, पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीमुळे सुमारे दोन तासांनी या प्रकरणावर पडदा पडला़ तर दुसऱ्या डॉक्टरांकडून रुग्णावर उपचार करून घेण्यात नातेवाईक व्यस्त असल्याची संधी साधून डॉ़ पवार यांनी रुग्णालयातून पळ काढला़
जिल्हा शासकीय रुग्णालयात इगतपुरी तालुक्यातील मायदरा गावातील नरहरी लोहकरे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ मात्र उपचार होत नसल्याने रुग्णाचे वडील व शिवसेनेच्या खेड गटाचे जिल्हा परिषद सदस्य तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या सदस्य हरिदास लोहकरे हे रात्री दहा वाजेच्या सुमारास रुग्णालयात पोहोचले़ त्यांना रुग्णालयात कर्तव्यावर असलेले डॉ. दिनेश पवार हे मद्यधुंद अवस्थेत आढळून आले़ त्यातच पवार हे उपचार करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला़
यानंतर लोहकरे व रुग्णाच्या नातेवाइकांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ गजानन होले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही़ यामुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी डॉ़ पवार यांना जाब विचारला असता बर्निंग वॉर्डमधील रुग्णावर उपचार करण्याच्या बहाण्याने सटकण्याचा प्रयत्न केला़
या घटनेची माहिती सरकारवाडा पोलिसांना कळताच त्यांनी रुग्णालयात पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली़ तसेच रुग्णाच्या नातेवाइकांची समजूत काढत असतानाच पवार ही संधी साधून निघून गेले़ दरम्यान, जिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यास नकार तसेच मद्यधुंद डॉक्टरांकडून रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार होत असल्याने जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांनी जिल्हा रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधिकारी आणि सरकारवाडा पोलिसांकडे लेखी तक्रार केली असून, डॉ. पवार यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.

Web Title: Rejecting the treatment of the doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.