महिलेचा मृत्यू झाल्याने नातेवाईक संतप्त; नाशिकच्या रुग्णालयात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 10:38 PM2018-03-08T22:38:38+5:302018-03-08T22:38:38+5:30

गंगापूररोडवरील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि.८) घडली. नातेवाईकांनी रुग्णालयीन व्यवस्थापनावर आरोप करत रुग्णालयाच्या परिसरात गोंधळ घातला.

Relatives fainted due to woman's death; Nashik hospital confusion | महिलेचा मृत्यू झाल्याने नातेवाईक संतप्त; नाशिकच्या रुग्णालयात गोंधळ

महिलेचा मृत्यू झाल्याने नातेवाईक संतप्त; नाशिकच्या रुग्णालयात गोंधळ

Next
ठळक मुद्दे गंगापूर पोलिसांनी हस्तक्षेपनंतर नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह ताब्यात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप

नाशिक : उपचारादरम्यान, इगतपुरी तालुक्यातील एका महिलेचा गंगापूररोडवरील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि.८) घडली. नातेवाईकांनी रुग्णालयीन व्यवस्थापनावर आरोप करत रुग्णालयाच्या परिसरात गोंधळ घातला.
दरम्यान, पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उपचारादरम्यान मिहलेचा मृत्यू झाल्यानंतर मिहलेच्या नातलगांनी रु ग्णालयात गोंधळ घातल्याचा प्रकार गंगापूर रोडवरील एका रु ग्णालयात घडला. गंगापूर पोलिसांनी हस्तक्षेप करीत नातलगांची समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. इगतपुरी तालुक्यातील एक विवाहिता मुतखड्याच्या शस्त्रिक्र येसाठी गंगापूर रोडवरील एका रु ग्णालयात आली होती. शस्त्रिक्र येदरम्यान, विवाहितेची प्रकृती अधिक खालावल्याने तत्काळ अतिदक्षता विभागात महिलेला हलविण्यात येऊन उपचार सुरू करण्यात आले; मात्र गुरूवारी सकाळच्या सुमारास विवाहितेचा मृत्यू झाला. ही घटना समजल्यानंतर नातलगांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करीत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. यामुळे झालेल्या गोंधळाने रुग्णालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याबाबत तत्काळ रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने गंगापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घडल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ रुग्णालय गाठले. यावेळी पोलीस अधिका-यांनी नातेवाईकांशी संवाद साधून त्यांची समजूत काढली.

 

Web Title: Relatives fainted due to woman's death; Nashik hospital confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.