रेल्वे वाहतुकीच्या नियमात शिथिलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 12:02 AM2020-04-16T00:02:16+5:302020-04-16T00:02:50+5:30

नाशिक जिल्ह्यातील कांदा व जळगाव जिल्ह्यातील केळी भारतात विविध राज्यात जाण्याकरिता राज्याचे पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार व महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे पुणे येथील संचालक सुनील पवार यांनी केलेल्या विनंतीनुसार रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाने आता रेल्वेने १६०० मेट्रिक टनाऐवजी ८०० मेट्रिक टन वाहतुकीस व परराज्यातील ठिकाणाचे दोनशे किलोमीटर अंतराची मर्यादा ५०० किलोमीटरपर्यंत वाढविल्याचे आदेश जारी केल्याची माहिती नाशिक येथील महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांनी दिली.

Relaxation in the rules of railway traffic | रेल्वे वाहतुकीच्या नियमात शिथिलता

रेल्वे वाहतुकीच्या नियमात शिथिलता

Next
ठळक मुद्देकांदा-केळी : आजपासून होणार अंमलबजावणी

लासलगाव : नाशिक जिल्ह्यातील कांदा व जळगाव जिल्ह्यातील केळी भारतात विविध राज्यात जाण्याकरिता राज्याचे पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार व महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे पुणे येथील संचालक सुनील पवार यांनी केलेल्या विनंतीनुसार रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाने आता रेल्वेने १६०० मेट्रिक टनाऐवजी ८०० मेट्रिक टन वाहतुकीस व परराज्यातील ठिकाणाचे दोनशे किलोमीटर अंतराची मर्यादा ५०० किलोमीटरपर्यंत वाढविल्याचे आदेश जारी केल्याची माहिती नाशिक येथील महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यातील कांदा व जळगाव जिल्ह्यातील केळी भारतात विविध राज्यात जावीत, यासाठी दोनशे किलोमीटर अंतराची व १६०० मे. टन ही एका रेल्वे मालवाहतूक गाडीची मर्यादा असल्याने व सध्या एकाच वेळी एकाच बाजारपेठेत हा माल गेला तर कमी भाव मिळून नुकसानीची भीती असल्याने कांदा व केळी पाठविण्यास व्यापारीवर्ग तयार नव्हते. ही बाब समजताच राज्याचे पणन विभागाचे प्रधान सचीव अनुप कुमार व महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे पुणे येथील संचालक सुनील पवार यांनी केलेल्या विनंतीनुसार रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाने संपुर्ण भारतभर कोरोनामुळे विविध राज्यात शेतीमालाचा तुटवडा होऊ नये व रास्त दरात सामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात याकरिता सुधारित आदेश जारी केला आहे.
नाशिक जिल्ह्यातील कांदा व जळगाव जिल्ह्यातील केळी दि. १६ एप्रिलपासून दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत ४२ वॅगन्समधून ८०० मेट्रिक टन वाहतूकीस व दोन माल उतरविणेचे परराज्यातील ठिकाणाचे दोनशे किलोमीटर अंतराची मर्यादा ५०० किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

Web Title: Relaxation in the rules of railway traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.