लाचेच्या आरोपातून अभियंत्याची मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:10 AM2018-03-10T00:10:01+5:302018-03-10T00:10:01+5:30

लासलगाव : लाचेची मागणी करून ती स्वीकारल्याच्या आरोपातील उपकार्यकारी अभियंता विवेक मवाडे यांची न्यायाधीश ए. जी. मोहबे यांनी मुक्तता केली आहे.

Release of Engineer from Lacheau's charge | लाचेच्या आरोपातून अभियंत्याची मुक्तता

लाचेच्या आरोपातून अभियंत्याची मुक्तता

Next

लासलगाव : विंचूर येथील लॉन्ससाठी वीज मीटर देण्यासाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारल्याच्या आरोपातील लासलगावचे तत्कालीन वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता विवेक मवाडे यांची निफाडचे जिल्हा सत्र न्यायाधीश ए. जी. मोहबे यांनी मुक्तता केली आहे. लासलगाव येथे उपविभागीय कार्यालयात उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असताना मवाडे यांनी तक्रारदाराकडून लॉन्सला वीज मीटर देण्यासाठी व वीज जोडणीसाठी पन्नास हजारांची लाच मागितली होती, त्यात पहिला टप्पा वीस हजारांची लाच स्वीकारताना मवाडे यांना रंगेहात पकडण्यात आले होते.

Web Title: Release of Engineer from Lacheau's charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा