पुनंद धरणाचे पाणी सुळे डाव्या कालव्यात सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 04:06 PM2019-08-01T16:06:15+5:302019-08-01T16:06:58+5:30
शेतकऱ्यांची मागणी : अत्यल्प पावसामुळे पीके धोक्यात
खामखेडा : कळवण व देवळा तालुक्यातील शेतीसाठी संजीवनी ठरणा-या सुळे डावा कालव्यात पुर पाणी सोडण्याची मागणी सुळे कालव्या अंतर्गत येण्या-या शेतकऱ्यांनी केली आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने धरण परिसरात संततधार धरली आहे. त्यामुळे पुनद ,चणकापुर आदि धरण्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून,गेल्या दोन दिवसापासून गिरणा व पुनद नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. गिरणा नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे. पुनद नदीवर अर्जुन सागर बंधारा बांधण्यात आला आहे. या धरणाची साठवन क्षमता मोठ्या प्रमाणात असल्याने, या धरणाच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी करण्याकरीता या धरणातुन सुळे डावा कालवा तयार करण्यात आला आहे. सदर कालवा हा देवळा तालुुक्यातील खामखेडा, सावकी गावाच्या शिवारातुन गेलेला असल्याने, या गावाच्या शिवारातील जमीन मोठ्या प्रमाणात ओलिताखाली येते. या कालव्यात पुुर पाणी सोडण्यात आले तर हे पाणी जमिनीत मुुुरून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते. गेल्या वर्षा उन्हाळ्यात या कालव्याला पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळी पिळकोस गावाच्या शिवेपर्यतच्या गावांना त्याचा उपयोग झाला होता. चालु वर्षी कळवण व देवळा तालुक्यातील सुळे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाºया गावामध्ये पाऊस झाला असला , तरी तो अगदी अल्प प्रमाणात झाला आहे. त्यामुळे पीके धोक्यात आली आहेत. मोठा पाऊस न झाल्यामुळे डोंगर उतारावरून पावसाचे पाणी न वाहिल्यामुळे शिवारातील नालाबांध भरलेले नाहीत. यामुळे गावाच्या शिवारातील जलसाठ्यात वाढ न झाल्याने अजूनही शिवारातील विहिरींना पाणी उतरलेले नाही.