रिलायन्स उद्योग समूहाची दिंडोरीत बाराशे कोटींची गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:11 AM2021-07-02T04:11:39+5:302021-07-02T04:11:39+5:30

रिलायन्स उद्योग समूहाचा भाग असलेल्या रिलायन्स लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या जीवनरक्षक औषधे उत्पादन संशोधन आणि विकास यात काम ...

Reliance Industries Group invests Rs 1,200 crore in Dindori | रिलायन्स उद्योग समूहाची दिंडोरीत बाराशे कोटींची गुंतवणूक

रिलायन्स उद्योग समूहाची दिंडोरीत बाराशे कोटींची गुंतवणूक

Next

रिलायन्स उद्योग समूहाचा भाग असलेल्या रिलायन्स लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या जीवनरक्षक औषधे उत्पादन संशोधन आणि विकास यात काम करणाऱ्या उद्योगाने दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथील औद्योगिक वसाहतीत १६१ एकर जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे मागितली आहे. नुकतीच शिष्टमंडळाकडून जागेची पाहणी करण्यात आली असून एमआयडीसीकडून त्यांना नियमाप्रमाणे ऑफर लेटर जाणार आहे. यानंतर अत्यंत कमी कालावधीमध्ये हा उद्योग सुरू होणार असून प्रत्यक्ष रोजगारनिर्मिती देखील यातून होणार आहे. रिलायन्स लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सध्या नवी मुंबईत २५ एकरवर आहे. उद्योग विस्तारासाठी त्यांनी सात ते आठ जागा बघितल्या होत्या. या उद्योगाचे शिष्टमंडळ नाशिकमध्ये आल्यानंतर येथील प्रादेशिक अधिकाऱ्यांनी त्यांना नाशिकची उत्तम कनेक्टिविटी, येथील औषधी कंपन्यांची परंपरा, उपलब्ध जागा, विविध शहरांसाठी असलेली विमानसेवा या सगळ्या बाबी अवगत केल्या. त्यामुळे ही गुंतवणूक दिंडोरीत करण्यास हा उद्योग तयार आहे. रिलायन्स लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड हा नाशिकच्या भविष्यकाळासाठी एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे.

इन्फो :

इंडियन ऑईलकडूनही जागेची मागणी

अक्राळे येथेच इंडियन ऑईल कॉर्पोरेशन यांनी देखील ६० एकर जागेची मागणी केली असून यात क्रायोजेनिक इंजिन्स आणि मोठमोठ्या ऑक्सिजन आणि इतर प्लांटसाठी लागणाऱ्या इंजिन्सचे उत्पादन केले जाणार आहे. लवकरच ही जागादेखील हस्तांतरित होऊ शकते. यातून शेकडो रोजगार निर्माण होऊ शकतील.

इन्फो==

बुधवारी (दि. ३०) एमआयडीसीच्या भूवाटप समितीची बैठक झाली. यात सहमुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कृष्णा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी काटकर,नाशिकचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांच्यासह रिलायन्स लाईफ सायन्सचे प्रमुख के. व्ही.सुब्रह्मण्यम्, सीईओ विनय रानडे, सीईओ दिनेश साठे, रामप्रसाद, ज्ञानेश्वर पाटील आदींबरोबर बैठक होऊन या प्रकल्पावर शिक्कामोर्तब करण्यात आले. एमआयडीसीने रिलायन्स लाइफ सायन्सला मागणीनुसार १६१ एकर जागा प्रदान केली असून, येत्या आठ-दहा दिवसांत ताबा दिला जाणार आहे. सुमारे पावणेदोनशे कोटी रुपयांमध्ये कंपनीला ही जागा दिली आहे. रिलायन्स सायन्सच्यावतीने येथे लसनिर्मितीसह इतरही औषध निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे. त्यात माणसांसह प्राण्यांना लागणारी प्रथिने, प्लाझ्मा थेरपीची औषधे, त्यावर संशोधनकार्य आणि उत्पादन केले जाणार आहे. तसेच या औषधांची निर्यातही केली जाणार आहे.

इन्फो ==

शासनामुळे ही गुंतवणूक दिंडोरीत येऊ शकली. लवकरच हा उद्योग सुरू होईल आणि ही प्राथमिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढेल. रिलायन्सने येथे गुंतवणूक केल्याने अनेक जागतिक पातळीवरचे उद्योग येथे गुंतवणुकीला पसंती देतील अशी अपेक्षा आहे.

-नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी नाशिक.

इन्फो===

केवळ ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रिकल हब अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये रिलायन्स उद्योग समूहाची गुंतवणूक येत असल्याने एक वेगळी ओळख तयार होईल. एरोस्पेस, डिफेन्स, केमिकल, फार्मा, फूड असे उद्योग आले पाहिजेत. रिलायन्स उद्योगामुळे नाशिकच्या फार्मा उद्योगाला बूस्ट मिळेल.

- वरुण तलवार, अध्यक्ष आयमा.

Web Title: Reliance Industries Group invests Rs 1,200 crore in Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.