महावितरण परिमंडळात ९४४ ग्राहकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:55 AM2019-09-16T00:55:19+5:302019-09-16T00:55:48+5:30
विजेची चोरी तसेच वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांची प्रकरणे जिल्ह्यातील लोकअदालतमध्ये ठेवण्यात आल्यानंतर नाशिक परिमंडळातील सुमारे ९४४ ग्राहकांनी ७४ लाखांच्या दंडाचा भरणा करून प्रकरणे निकाली काढली.
नाशिक : विजेची चोरी तसेच वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांची प्रकरणे जिल्ह्यातील लोकअदालतमध्ये ठेवण्यात आल्यानंतर नाशिक परिमंडळातील सुमारे ९४४ ग्राहकांनी ७४ लाखांच्या दंडाचा भरणा करून प्रकरणे निकाली काढली.
नाशिक शहर, मालेगाव आणि अहमदनगर मंडळातील एकूण ९४४ ग्राहकांनी प्रतिसाद देऊन तडजोडीच्या माध्यमातून नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये घेण्यात आलेल्या लोकअदालतमध्ये ७४ लाख १४ हजार रु पयांचा भरणा करून सदर प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
महावितरणकडून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेले व वीजचोरी संबंधित दाखलपूर्व प्रकरणे तसेच न्यायालयात प्रलंबित असलेली हजारो प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यात कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेले ग्राहक यामध्ये मालेगाव मंडळाचे ४४, नाशिक शहर मंडळाचे ८४ अहमदनगर मंडळाचे सहा अशा एकूण ९३४ दाव्यामध्ये ग्राहकांनी तडजोड करीत २५ लाख ३० हजार रुपयांचा भरणा केला तसेच वीजचोरी संबंधित दाव्यांमध्ये मालेगाव मंडळाचे ३९३, नाशिक शहर मंडळाचे १३८ आणि अहमदनगर मंडळामध्ये ३३९ अशा एकूण ८१० दाव्यामध्ये तडजोड करीत ग्राहकांनी ४८ लाख ८४ हजार रु पयांचा भरणा केला आहे.
नोटीस दिल्यानंतर प्रकरणे लोकअदालतीत
विधी सेवा प्राधिकरण अधिनियमप्रमाणे संबंधितांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. संबंधितांनी नाशिक व अहमदनगरमधील जिल्हा व तालुका न्यायालयात उपस्थित राहून त्यांनी या संधीचा लाभ घेतला. या लोकअदालतीमध्ये विनाविलंब न्याय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच परस्पर समन्वयासाठी लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते.