गुजरातमधून येणाऱ्या साईभक्तांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:24 AM2019-06-05T00:24:44+5:302019-06-05T00:25:31+5:30

सायखेडा : गुजरात राज्यातून महाराष्टÑातील शिर्डी, शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी येणाºया भाविकांसाठी महत्त्वपूर्ण असणारा सुरत-शिर्डी महामार्गावरील सायखेडा ते भेंडाळी रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून, या रस्त्यामुळे भाविकांचा प्रवास जलद होऊ शकणार आहे.

Relief for the devotees coming from Gujarat | गुजरातमधून येणाऱ्या साईभक्तांना दिलासा

सायखेडा ते भेंडाळी रस्त्याचे सुरु असलेले काम.

Next
ठळक मुद्देनागरिकांमध्ये समाधान : सायखेडा ते भेंडाळी रस्त्याचे काम प्रगतिपथावर

सायखेडा : गुजरात राज्यातून महाराष्टÑातील शिर्डी, शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी येणाºया भाविकांसाठी महत्त्वपूर्ण असणारा सुरत-शिर्डी महामार्गावरील सायखेडा ते भेंडाळी रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून, या रस्त्यामुळे भाविकांचा प्रवास जलद होऊ शकणार आहे.
गोदाकाठची मुख्य बाजारपेठ असणाºया सायखेड्यापासून जवळपास असणाºया सर्व छोट्या खेड्यांत जाणारे रस्ते वर्दळीचे आहेत. सायखेड्यापासून पूर्वेला असणारी अनेक छोटी खेडी आणि गुजरात राज्यातून शिर्डीकडे जाणारे सर्व भाविकांचा रहदारीचा असणारा सुरत ते शिर्डी महामार्ग सायखेडापासून भेंडाळीपर्यंत खराब झाला होता. रस्त्यावर अनेक छोटे-मोठे खड्डे पडले होते. रस्त्याचे काम व्हावे, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती.
सिन्नर, कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांतील रहिवासी नाशिकला जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. गोदाकाठ भागातील शेतमाल नाशिक, पिंपळगाव, सायखेडा, ओझर या बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन जाण्यासाठी हाच एकमेव रस्ता आहे. गोदाकाठ भागातील पूर्वेकडील अनेक गावांमधील ग्रामस्थ सायखेडा येथे सातत्याने येतात, ते याच मार्गाचा वापर करतात. गुजरात राज्यातून येणारे अनेक भाविक या रस्त्याचा वापर करतात. जवळचा आणि नाशिक, सिन्नर या शहरातून जावे लागत नसल्याने हा पर्यायी रस्ता वापरला जातो. ओझर ते सायखेड्यापर्यंत काम पूर्ण झाले होते. सायखेडापासून पुढे मात्र रस्त्यावर अनेक छोटे-मोठे खड्डे पडले होते. गुजरात राज्यातून शिर्डीकडे येणाºया भाविकांसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा रस्ता सायखेडा ते भेंडाळीपर्यंत खराब झाला होता. रस्त्यावर अनेक खड्डे पडले होते. सिन्नर, कोपरगाव तालुक्यातील बरेच प्रवासी नाशिकला येण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. शिवाय गोदाकाठ भागातील अनेक गावे या रस्त्याचा वापर नाशिक, सायखेडा, ओझर, पिंपळगाव येथे जाण्यासाठी करतात. रस्त्याचे काम सुरू असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे
- भाऊसाहेब कमानकर, भेंडाळी

Web Title: Relief for the devotees coming from Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.