ब-सत्ता प्रकारातील त्रस्त नागरिकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:11 AM2021-06-21T04:11:51+5:302021-06-21T04:11:51+5:30
बीटू संघर्ष समितीच्या वतीने झालेल्या निर्णयाचे स्वागत व सत्कार सोहळा येथील बालगंधर्व मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ...
बीटू संघर्ष समितीच्या वतीने झालेल्या निर्णयाचे स्वागत व सत्कार सोहळा येथील बालगंधर्व मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री भुसे बोलत होते. फेब्रुवारी २००६ पासून ब-सत्ता प्रकाराचा संघर्ष सुरू झाला असून, आज या लढ्याला ९० टक्के यश प्राप्त झाले आहे. शहरातील ९९ टक्के मिळकतींच्या मूल्यांकनाचे दर प्राप्त झाल्यामुळे मूल्यांकनाचे अडथळेही आता दूर झाले आहेत. ब-सत्ता प्रकारातील मिळकतींचा धारणाधिकार रूपांतरित करण्यासाठी कालमर्यादा ठरविण्यात आली असून, नागरिकांनी विहीत मुदतीत त्याचा पाठपुरावा करण्याचे आवाहनही मंत्री भुसे यांनी केले आहे. बंडू माहेश्वरी यांनी प्रस्तावनेतून बीटू संघर्ष समितीच्या कामकाजाचा आढावा सादर केला. डॉ. संजय जोशी यांनी आभार मानले. या प्रसंगी उपमहापौर नीलेश आहेर, नगर भूमापन अधिकारी जितेंद्र भिंगारदिवे, उपअधीक्षक भूमिअभिलेख भगवान शिंदे, सहायक दुय्यम निबंधक प्रशांत कुलकर्णी, संजय दुसाने, राजाराम जाधव, सखाराम घोडके, किशोर बच्छाव, ॲड. सतीश कजवाडकर, ॲड. बच्छाव यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
इन्फो
स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करा
शासन निर्णयानुसार मिळकतीचा धारणाधिकार रूपांतरित करण्यासाठी ८ मार्च २०२२पर्यंत मुदत दिली आहे. नागरिकांचे प्रस्ताव तात्काळ मार्गी लावण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करून जलद गतीने या प्रकरणांचा निपटारा करावा, आवश्यकता भासल्यास शिबिराचे आयोजन करावे. बीटू संघर्ष समितीनेदेखील पुढाकार घेऊन नागरिकांना योग्य मार्गदर्शन करण्याबाबतही भुसे यांनी आवाहन केले आहे.
इन्फो
मूल्यांकनानुसार नजराणा आकारणी
उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा म्हणाले, शासनाने केवळ जमीन दिल्यामुळे त्यावरील बांधकाम सोडून केवळ भूखंडाच्या मूल्यांकनानुसार नजराणाची आकारणी होणार आहे. तथापि शासनाने घालून दिलेल्या विहीत कालमर्यादेत सवलतीच्या दरात १५ टक्के नजराणा आकारणी होणार असल्यामुळे सर्व संबंधितांनी नोंद घेऊन परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचेही त्यांनी नमूद केले.
फोटो- २० मालेगाव दादा भुसे
बीटू संघर्ष समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना कृषिमंत्री दादा भुसे. समवेत व्यासपीठावर उपमहापौर नीलेश आहेर, जितेंद्र भिंगारदिवे, भगवान शिंदे, प्रशांत कुलकर्णी आदी.
===Photopath===
200621\20nsk_26_20062021_13.jpg
===Caption===
फोटो- २० मालेगाव दादा भुसे बीटू संघर्ष समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना कृषिमंत्री दादा भुसे. समवेत व्यासपीठावर उपमहापौर निलेश आहेर, जितेंद्र भिंगारदिवे, भगवान शिंदे, प्रशांत कुलकर्णी आदी.