सप्तशृंगगड येथील अतिक्रमणधारकांना दिलासा

By admin | Published: February 2, 2016 10:25 PM2016-02-02T22:25:36+5:302016-02-02T22:26:12+5:30

सप्तशृंगगड येथील अतिक्रमणधारकांना दिलासा

Relief to encroachers at Saptashringagad | सप्तशृंगगड येथील अतिक्रमणधारकांना दिलासा

सप्तशृंगगड येथील अतिक्रमणधारकांना दिलासा

Next

सप्तशृंगगड : अतिक्रमण काढण्यासाठी मंगळवारी कारवाई होणार होती. मात्र कळवण-सुरगाणा विधानसभेचे आमदार जिवा पांडू गावित यांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची भेट घेऊन गडावरील व वन विभागातील अतिक्रमणाविषयी चर्चा करून आठ दिवसांची मुदत घेऊन अतिक्रमण निर्मूलन मोहीम पुढे ढकलल्याची माहिती कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष सावळीराम पवार यांनी दिली. त्यामुळे अतिक्रमणधारकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी प्रांताधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी सप्तशृंगगडास भेट देऊन अतिक्रमणाची पाहणी केली होती. मोजमाप करून अतिक्रमण २ फेब्रुवारीपर्यंत काढून घेण्याबाबत सूचित करण्यात आले होते. ग्रामपंचायतीतर्फे अतिक्रमण-धारकांना नोटीस बजावण्यात आली होती. आज प्रशासनाकडून चार जेसीबी, पाच ट्रॅक्टर, अग्निशामक वाहन यांच्यासह १०० पोलीस कर्मचारी पोलीस, निरीक्षक, उपअधीक्षक फौज फाट्यासह हजर झाले होते. यावेळी व्यापाऱ्यांची एकच धावपळ उडाली. तसेच वनविभाग हद्दीतील व गावातील अतिक्रमण काढण्याचे ठरविल्याने सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात येणार होता. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच दुकाने बंद ठेवली होती. (वार्ताहर)
देवीच्या दर्शनासाठी मंगळवारी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. परंतु व्यापाऱ्यांनी अचानक हॉटेल, नारळ, प्रसाद दुकाने बंद ठेवल्याने भाविकांचे हाल झाले. त्यानंतर दुपारनंतर सर्व दुकाने उघडण्यात आली. यावेळी तहसीलदार अनिल पुरे, प्रांताधिकारी गंगाथरण डी., उपविभागीय पोलीस अधिकारी निखाते, गटविकास अधिकारी तुकाराम सोनवणे, सरपंच सुमनबाई सूर्यवंशी, उपसरपंच गिरीश गवळी, ग्रामपंचायत सदस्य गणेश बर्डे, राजेश गवळी, संदीप बेनके उपस्थित होते. (वार्ताहर)

इन्फो :

Web Title: Relief to encroachers at Saptashringagad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.