थंडीचा जोर ओसरल्याने शेतकऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 06:46 PM2019-01-03T18:46:33+5:302019-01-03T18:46:47+5:30
सायखेडा : निफाड तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या थंडीचा जोर कमी झाला आहे. दहा दिवस प्रचंड थंडी असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.
सायखेडा : निफाड तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या थंडीचा जोर कमी झाला आहे. दहा दिवस प्रचंड थंडी असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. द्राक्षबाग आणि इतर अनेक पिकांना जास्त थंडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी धास्तावले होते, जनावरांचा प्रश्न निर्माण झाला होता. दोन दिवसांपासून थंडी कमी झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे, सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर आले आहे
उत्तर भारतात सर्वत्र थंडी वाढल्याने त्याचा परिणाम नाशिक जिल्ह्यात झाला जिल्ह्यात सर्वाधिक कमी तापमान निफाड तालुक्यात होते. दोन दिवस उणे तापमान तर पाच दिवस दोन अंशाखाली आले होते तर तीन दिवस पाच अंशाच्या आत बाहेर होते. त्यामुळे सलग दहा ते बारा दिवस तापमान कमी असल्याचा दहावर्षातील विक्र म नोंदविला गेला. थंडीचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि मुके जनावरे यांना बसला द्राक्ष मन्यांना तडे गेले , पाने पिवळी पडली, वेल करपून गेले, फुगवण थांबली होती, भुरी नियंत्रणासाठी शेतकर्यांना कसरत करावी लागली औषधांचा वापर वाढला, बागेत शेकोटी करावी लागली, साड्यांचे आच्छादन पसरले, पहाटे उठून पाणी द्यावे लागले अशा विविध योजना सुरू ठेऊन शेतकर्यांनी बागा वाचवल्या आहेत.
अनेक ठिकाणी मुक्या जनावरांची हाल झाले. रात्रंदिवस थंडीत कुडकुडणारे जनावरांची चारा उपलब्ध होत नसल्याने हाल झाले. दोन दिवसांपासून थंडी कमी झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. पीक वाचल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.