निफाड तालुक्यातील चार गावांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 01:43 AM2019-08-01T01:43:26+5:302019-08-01T01:44:21+5:30

ओझर : निफाड तालुक्यातील महाजपूरसह चितेगाव येथील चितळेश्वर, पिंपळस येथील मामलेश्वर व सुकेणे येथील गुरुदत्त उपसा जलसिंचन योजनेचा पाणीहक्क अबाधित ठेवण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मंत्रालयात बुधवारी (दि.३१) झालेल्या बैठकीत दिले आहेत. सदर संस्थांची पाणी परवानगी कालव्यावर वर्ग करण्याची प्रक्रि या अंतिम टप्प्यात असून, सर्व कायदेशीर बाबी पार पडल्यानंतर लवकरच या गावांना हक्काचे पाणी मिळणार आहे.

Relief to four villages in Niphad taluka | निफाड तालुक्यातील चार गावांना दिलासा

मुंबई येथे पाणी वापर योजनांच्या बैठकीप्रसंगी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासमवेत आमदार अनिल कदम, अधिकारी व पाणी योजनांचे पदाधिकारी.

Next
ठळक मुद्देहक्काचे पाणी मिळणार : जलसंपदा राज्यमंत्र्यांनी दिले निर्देश

ओझर : निफाड तालुक्यातील महाजपूरसह चितेगाव येथील चितळेश्वर, पिंपळस येथील मामलेश्वर व सुकेणे येथील गुरुदत्त उपसा जलसिंचन योजनेचा पाणीहक्क अबाधित ठेवण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मंत्रालयात बुधवारी (दि.३१) झालेल्या बैठकीत दिले आहेत. सदर संस्थांची पाणी परवानगी कालव्यावर वर्ग करण्याची प्रक्रि या अंतिम टप्प्यात असून, सर्व कायदेशीर बाबी पार पडल्यानंतर लवकरच या गावांना हक्काचे पाणी मिळणार आहे.
बैठकीला आमदार अनिल कदम यांच्यासह जलसंपदा विभागाचे उपसचिव कपोले, संगमनेरच्या कार्यकारी अभियंता श्रीमती जगताप, नाशिकचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. शिंदे, उपअभियंता तांदळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. सदर तिन्ही गावच्या उपसा सिंचन संस्थांना तत्काळ त्यांच्या पाणी वापराचा हक्क अबाधित करण्याचे निर्देश देतानाच तालुक्यातील ज्या पाणी वापर
बंद पडलेल्या संस्था आहेत त्यांचा सखोल चौकशी अहवाल संबंधित पाटबंधारे विभागाकडून मागविण्याच्या सूचनाही राज्यमंत्री शिवतारे यांनी दिल्या.
चितेगावची चितळेश्वर, पिंपळसची मामलेश्वर व सुकेणे येथील गुरुदत्त उपसा सिंचन योजनांच्या मागील झालेल्या बैठकीमध्ये सर्व क्षेत्राविषयी अहवाल परिपूर्ण नसल्या कारणाने निर्णय
होऊ शकला नव्हता. त्यावर तत्काळ निर्णय घेण्यासाठी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या दालनांमध्ये सदरची बैठक आयोजित करण्यात आली होती.
पाणी वापर संस्थांच्या बाबतीमध्ये योजनानिहाय परिपूर्ण अहवाल पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता आर. एस. शिंदे यांना सादर करण्याचे निर्देश शिवतारे यांनी दिले. त्याचप्रमाणे सदर पाणी वापर संस्थांच्या बाबत प्रथम पाण्याचा हक्क अबाधित आरक्षित करण्याच्या सूचनाही कार्यकारी अभियंता आर. एस. शिंदे यांना मंत्री शिवतारे यांनी दिले.महाजनपूरला
कडवाचे पाणीमहाजनपूर येथील शेतकऱ्यांसाठी कडवा कालव्याच्या पाण्याबाबत चर्चा बैठकीत करण्यात आली. त्यामुळे १४४ हेक्टर क्षेत्राला हक्काचे पाणी मिळणार आहे. निफाड तालुक्यातील कडवा कालवा सुरू होऊन साधारण वीस वर्षे झाली परंतु पाटबंधारे खात्याकडून शेतकऱ्यांवर अन्याय केल्याची व्यथा शेतकºयांनी बैठकीवेळी मांडली.
सदर कडवा कालव्याच्या १० हजार ९०० हेक्टर क्षेत्रापैकी दहा टक्के म्हणजे १०९० हेक्टर क्षेत्राला पाणी देणे शक्य आहे. महाजनपूर येथील शेतकºयांना केवळ १४४ हेक्टरला पाणी हवे असल्याने सदर शेतकºयांची मागणी तात्काळ मान्य करून पाणी देण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाला शिवतारे यांनी दिले.

मुंबई येथे पाणी वापर योजनांच्या बैठकीप्रसंगी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासमवेत आमदार अनिल कदम, अधिकारी व पाणी योजनांचे पदाधिकारी.निफाड तालुक्यातील चार गावांना दिलासाहक्काचे पाणी मिळणार : जलसंपदा राज्यमंत्र्यांनी दिले निर्देशओझर : निफाड तालुक्यातील महाजपूरसह चितेगाव येथील चितळेश्वर, पिंपळस येथील मामलेश्वर व सुकेणे येथील गुरुदत्त उपसा जलसिंचन योजनेचा पाणीहक्क अबाधित ठेवण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मंत्रालयात बुधवारी (दि.३१) झालेल्या बैठकीत दिले आहेत. सदर संस्थांची पाणी परवानगी कालव्यावर वर्ग करण्याची प्रक्रि या अंतिम टप्प्यात असून, सर्व कायदेशीर बाबी पार पडल्यानंतर लवकरच या गावांना हक्काचे पाणी मिळणार आहे.
बैठकीला आमदार अनिल कदम यांच्यासह जलसंपदा विभागाचे उपसचिव कपोले, संगमनेरच्या कार्यकारी अभियंता श्रीमती जगताप, नाशिकचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. शिंदे, उपअभियंता तांदळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. सदर तिन्ही गावच्या उपसा सिंचन संस्थांना तत्काळ त्यांच्या पाणी वापराचा हक्क अबाधित करण्याचे निर्देश देतानाच तालुक्यातील ज्या पाणी वापर
बंद पडलेल्या संस्था आहेत त्यांचा सखोल चौकशी अहवाल संबंधित पाटबंधारे विभागाकडून मागविण्याच्या सूचनाही राज्यमंत्री शिवतारे यांनी दिल्या.
चितेगावची चितळेश्वर, पिंपळसची मामलेश्वर व सुकेणे येथील गुरुदत्त उपसा सिंचन योजनांच्या मागील झालेल्या बैठकीमध्ये सर्व क्षेत्राविषयी अहवाल परिपूर्ण नसल्या कारणाने निर्णय
होऊ शकला नव्हता. त्यावर तत्काळ निर्णय घेण्यासाठी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या दालनांमध्ये सदरची बैठक आयोजित करण्यात आली होती.
पाणी वापर संस्थांच्या बाबतीमध्ये योजनानिहाय परिपूर्ण अहवाल पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता आर. एस. शिंदे यांना सादर करण्याचे निर्देश शिवतारे यांनी दिले. त्याचप्रमाणे सदर पाणी वापर संस्थांच्या बाबत प्रथम पाण्याचा हक्क अबाधित आरक्षित करण्याच्या सूचनाही कार्यकारी अभियंता आर. एस. शिंदे यांना मंत्री शिवतारे यांनी दिले.महाजनपूरला
कडवाचे पाणीमहाजनपूर येथील शेतकऱ्यांसाठी कडवा कालव्याच्या पाण्याबाबत चर्चा बैठकीत करण्यात आली. त्यामुळे १४४ हेक्टर क्षेत्राला हक्काचे पाणी मिळणार आहे. निफाड तालुक्यातील कडवा कालवा सुरू होऊन साधारण वीस वर्षे झाली परंतु पाटबंधारे खात्याकडून शेतकऱ्यांवर अन्याय केल्याची व्यथा शेतकºयांनी बैठकीवेळी मांडली.
सदर कडवा कालव्याच्या १० हजार ९०० हेक्टर क्षेत्रापैकी दहा टक्के म्हणजे १०९० हेक्टर क्षेत्राला पाणी देणे शक्य आहे. महाजनपूर येथील शेतकºयांना केवळ १४४ हेक्टरला पाणी हवे असल्याने सदर शेतकºयांची मागणी तात्काळ मान्य करून पाणी देण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाला शिवतारे यांनी दिले.

Web Title: Relief to four villages in Niphad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी