इथेनॉल दरवाढीने साखर उद्योगाला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:01 AM2018-09-15T00:01:32+5:302018-09-15T00:20:52+5:30
अतिरिक्त साखर उत्पादनामुळे साखरेचे भाव कमी होऊन साखर व्यवसाय अडचणीत येण्यावर तोडगा म्हणून तसेच पेट्रोल, डिझेलच्या गगनाला भिडलेल्या दर नियंत्रणासाठी जुलै महिन्यात केंद्र सरकारने उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीला परवानगी दिल्यानंतर इथेनॉलच्या दरात घसघशीत वाढ करीत साखर कारखाने व ऊस उत्पादकांना खूश केले आहे.
दिंडोरी : अतिरिक्त साखर उत्पादनामुळे साखरेचे भाव कमी होऊन साखर व्यवसाय अडचणीत येण्यावर तोडगा म्हणून तसेच पेट्रोल, डिझेलच्या गगनाला भिडलेल्या दर नियंत्रणासाठी जुलै महिन्यात केंद्र सरकारने उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीला परवानगी दिल्यानंतर इथेनॉलच्या दरात घसघशीत वाढ करीत साखर कारखाने व ऊस उत्पादकांना खूश केले आहे.
या निर्णयाचे साखर उद्योग व ऊस उत्पादकांनी स्वागत केले आहे. उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर प्रतिलिटर
४७.५० रु पयांवरून थेट ५९.५० रु पयांवर नेण्यात आले आहे. केंद्राने इथेनॉल दरवाढ करून साखर उद्योगांची अनेक दिवसांची
मागणी पूर्ण केली आहे. साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती
करण्यास दीड महिन्यापूर्वी सरकारने परवानगी दिली होती. विक्र मी साखर उत्पादन हेही त्यामागचे एक कारण होते. यासंदर्भात सरकारने २६ जुलै २०१८ रोजी निर्णय जाहीर केला होता. एक टन साखर म्हणजे ६०० लिटर इथेनॉल ही तुलना करीत बहुतांश साखर कारखाने इथेनॉलकडे वळाल्यास देशातील साखर व इंधनाच्या मागणी-पुरवठ्याचे संतुलन साधण्याचा एक प्रयत्न या निर्णयातून केंद्र सरकारने केला आहे.
एकंदरीत ब्राझिलच्या धर्तीवर आता देशातील साखर कारखाने सोईनुसार साखर व इथेनॉल निर्मितीचे पर्याय स्वीकारतील. आता इथेनॉलचे दर वाढीव ठेवल्याने कारखान्यांनाही इथेनॉलवर भर देणे सहज शक्य होणार आहे.