तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 11:59 PM2020-10-07T23:59:09+5:302020-10-08T00:07:29+5:30
नाशिक: नाशिक विभागातील तलाठी संवर्गातील २११८ पदांचा आकृतीबंध शासनाने मंजूर केला असून त्यानुसार उत्तर महाराष्टÑातील ७५४ पदांना फेब्रुवारी २०२१ पयंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नाशिक जिल्'ातील २१४ पदांचा यात समावेश आहे.
नाशिक: नाशिक विभागातील तलाठी संवर्गातील २११८ पदांचा आकृतीबंध शासनाने मंजूर केला असून त्यानुसार उत्तर महाराष्टÑातील ७५४ पदांना फेब्रुवारी २०२१ पयंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नाशिक जिल्'ातील २१४ पदांचा यात समावेश आहे.
उत्तर महाराष्टÑातील नाशिक,धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर जिल्'ात तलाठी संवर्गातील २१२८ इतकी मंजूर पदे आहेत. त्यामध्ये १३६४ पदे ही स्थायी स्वरुपाची तर ७५४ पदे ही अस्थायी स्वरुपाची आहेत. आस्थायी पदांची दर सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जाते. या पदांना गेल्या मार्च महिन्यात मुदतवाढ देण्यात आली होती ही मुदतवाढ ३१ आॅक्टोबर महिन्यात संपुष्टात येत आहे. महिना अखेर संपुष्टात येणाऱ्या पदांना मंजुरी देण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी शासनाला प्रस्ताव सादर केला होता.
विभागातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांपैकी कोणतेही पद हे सहामन्यिांपेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त नसल्याने विभागीय आयुक्तांनी केलेल्या शिफारशीनुसार शासनाने या ७५४ पदांना सप्टेबर२०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधींपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे आता सुधारीत आकृतीबंद तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सुचना विभागीय आयुक्तांना देण्यात आलेल्या आहेत.
जिल्हा. मंजूर पदे स्थायी अस्थायी
नाशिक ५५० ३३६ २१४
धुळे २३३ १५० ८३
नंदुरबार २३० १३२ ९८
जळगाव ५२२ ३३६ १८६
नगर . ५८३. ४१० १७३
एकुण २११८. १३६४ ७५४