तहानलेल्या आदिवासी पाड्याला मदतीचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:15 AM2021-04-08T04:15:41+5:302021-04-08T04:15:41+5:30

परिसरामधील शाळेतील शिक्षक दिलीप आहिरे व सुरेश सूर्यवंशी यांनी या कामी पुढाकार घेतल्याने तहानलेल्या आदिवासींना दिलासा मिळाला. घोटविहिरा हे ...

Relief to the thirsty tribal pada | तहानलेल्या आदिवासी पाड्याला मदतीचा दिलासा

तहानलेल्या आदिवासी पाड्याला मदतीचा दिलासा

Next

परिसरामधील शाळेतील शिक्षक दिलीप आहिरे व सुरेश सूर्यवंशी यांनी या कामी पुढाकार घेतल्याने तहानलेल्या आदिवासींना दिलासा मिळाला. घोटविहिरा हे गाव नेहमीच पाण्याचे भीषण दुष्काळी गाव आहे. या गावाला अमास सेवा ग्रुप मुंबई व पुष्य सेवा ग्रुप विलेपार्ले, सेवा समिती ग्रुप, गुंदेचा गार्डन लालबाग, मुंबई यांच्या वतीने हा मदतीचा हात देण्यात आला. गावातील महिलांना उन्हाळ्यात सुमारे ४ किमी अंतरावरून पाणी आणावे लागते. अशा स्थितीत पाण्याचे ड्रम रोलर मिळाल्याने डोक्यावरचे ओझे कमी झाल्याची भावना या आदिवासी महिलांनी व्यक्त केली. ड्रम वितरण प्रसंगी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यावेळी ग्रामस्थ सुभाष चौधरी, नंदराज चौधरी, ग्रामपंचायत सदस्य भागवत चौधरी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. पाण्याचे ड्रम रोलर मिळविण्यासाठी ज्ञानेश्वर कोकणे, गिरीश बोरसे, दिलीप शिंदे, विजय भोये, धर्मराज मोरे आदींनी मदत केली. पाण्याचे ड्रम उपलब्ध करून दिल्याबद्दल अमास सेवा ग्रुपचे मार्गदर्शक विजय भगत, संचालक चंद्रकांत भाई देढीया व इतर सर्व देणगीदारांंचे आदिवासी बांधवांनी आभार मानले.

फोटो

०७आदिवासी मदत

Web Title: Relief to the thirsty tribal pada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.