जीवनात धर्माचे अधिष्ठान महत्त्वाचे : प्रमोदमुनीजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 01:07 AM2018-10-22T01:07:13+5:302018-10-22T01:07:30+5:30

मानव जन्म हा फार मोठ्या पुण्याईने मिळाला असून, त्याचे सार्थक करावयाचे असेल तर जीवनात धर्माचे अधिष्ठान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन पंडितरत्न प्रमोदमुनीजी महाराज यांनी केले.

Religion is important in life: Pramod Muniji | जीवनात धर्माचे अधिष्ठान महत्त्वाचे : प्रमोदमुनीजी

जीवनात धर्माचे अधिष्ठान महत्त्वाचे : प्रमोदमुनीजी

Next
ठळक मुद्देकेवडीबन : दीक्षा जयंती उत्साहात

नाशिक : मानव जन्म हा फार मोठ्या पुण्याईने मिळाला असून, त्याचे सार्थक करावयाचे असेल तर जीवनात धर्माचे अधिष्ठान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन पंडितरत्न प्रमोदमुनीजी महाराज यांनी केले.
तपोवन पंचवटी येथील केवडीवन स्थानकात आज जैनाचार्य धर्मदास महाराज पंडितरत्न विनयचंद्र महाराज यांची दीक्षा जयंती व उपप्रवर्तक प्रकाशसवाजी यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त आयोजित त्रिवेणी समारंभप्रसंगी बोलताना केले.
प.पू. प्रमोदमुनीजी, चैतन्य मुनीजी, महेंद्र मुनीजी, महासती सुशीलकवलजी महाराज यांनी त्यांच्या आठवणी सांगून जैन धर्मातील त्यांचे महत्त्व विषद केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले पारस साखला, विनोद सराफ, महेंद्र बोरा, गौतम सुराणा, मनोज मुथा, डॉ. पारस सुराणा, जे. सी. भंडारी आदींची भाषणे झाली. कार्यक्रमास शांतीलाल चोपडा, कचरदास समदडिया, पारस समदडिया, विजय ओस्तवाल, सुखलाल कोचर, पुखराज ओस्तवाल, सुरेंद्र टाटिया, भवरीलाल चतुरमुथा आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Religion is important in life: Pramod Muniji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.