धर्म हाच सुख-शांतिप्राप्तीसाठी पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 08:54 PM2020-12-26T20:54:25+5:302020-12-27T00:33:30+5:30
वणी : कोरोनासारख्या स्थितीने साऱ्या जगाला पछाडले आहे. अशा संकटकाळात सुख-शांतिप्राप्तीसाठी धर्म हाच पर्याय असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ जैन मुनी आचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी म.सा. यांनी येथे केले. येत्या ३० व ३१ डिसेंबर रोजी वणी येथे जैन समाजाच्या तपस्विनी लक्ष्मीदेवी पूनमचंद डागा यांच्या १८० उपवास तपाची सांगता संखेश्वर मंदिरात होत असून, त्यानिमित्त मुनीजींचे आगमन झाले आहे.

वणी येथे मुनीजींचे आगमन झाल्यानंतर त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यांच्यासमवेत आचार्य विजयरामचंद्र सुरीश्वरजी महाराज, आचार्य विजय पुण्यपाल सुरीजी, आचार्य मुक्तिप्रभू सुरीश्वरजी, आचार्य कीर्तियश सुरीश्वरजी, प्रसुरीश्वरजी यांच्यासह ७० साधुगण उपस्थित आहेत. दरम्यान, वणी शहरात सुरू असलेल्या जैन मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाची पाहणी जैन मुनींनी केली व जैन बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच वणी गावातून संखेश्वर मंदिरापर्यंत मार्गक्रमण करताना उपस्थितांना आशीर्वचन दिले. येत्या ३० व ३१ डिसेंबर रोजी वणी शहरात संख्येश्वर मंदिरात उपवास तपाची सांगता होत असून, त्यावेळी आचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांची उपस्थिती लाभणार आहे. दि. ३० डिसेंबर रोजी शकस्त व अभिषेक, तर दि. ३१ डिसेंबर रोजी समूह दर्शन, मांगलिक प्रवचन, पारणा तसेच विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
आत्मचिंतनाची बैठक
वणी येथे आचार्य पुूण्यपाल सुरीश्वरजी महाराजांच्या उपस्थितीत सामुदायिक आत्मचिंतनाची बैठक होणार आहे. नवीन साधू-संत यांचा परिचय व्हावा, जैन शास्रांची माहिती व्हावी, एकमेकांच्या विचारांचे आदान-प्रदान व्हावे, शास्रीयदृष्ट्या तिथींचे पालन व्हावे याकरिता ही आत्मचिंतनाची बैठक आयोजित केली आहे. ६४ वर्षांपूर्वी आचार्यांनी वणीत दीक्षा घेतली होती. त्यावेळी ते अवघे ८ वर्षांचे होते. आता त्यांच्याच दीक्षास्थानावर ही बैठक होत असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.