त्र्यंबकला धार्मिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 12:07 AM2019-12-27T00:07:30+5:302019-12-27T00:08:09+5:30

त्र्यंबकेश्वर शहरात ग्रहण काळात तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त परिसरात विविध धार्मिक विधी करण्यात आले. ग्रहण सुटल्यानंतर भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी तसेच कुशावर्त तीर्थ येथे स्नानासाठी गर्दी केली होती.

Religious events in Trimbak | त्र्यंबकला धार्मिक कार्यक्रम

ग्रहणकाळात त्र्यंबकेश्वर कुशावर्त तीर्थावर धार्मिक विधी करताना भाविक.

Next

त्र्यंबकेश्वर : शहरात ग्रहण काळात तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त परिसरात विविध धार्मिक विधी करण्यात आले. ग्रहण सुटल्यानंतर भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी तसेच कुशावर्त तीर्थ येथे स्नानासाठी गर्दी केली होती.
भगवान त्र्यंबकेश्वर मंदिरात देवस्थान ट्रस्टतर्फे एका विशेष धार्मिक पूजेचे आयोजन करण्यात आले होते. काही भाविक कुशावर्त तीर्थातील पाण्यात उभे राहून तर कुणी कुशावर्त तीर्थाच्या काठावर बसून हात जोडून जपजाप्य करीत होते. काही साधक कुशावर्त तीर्थ तसेच गावातील ठिकठिकाणच्या जलाशयात उभे राहून जपजाप्य करीत होते. ग्रहण सुटल्यावर अनेक भाविकांनी स्नान करून शुचिर्भूत होऊन दर्शन केले. त्र्यंबकेश्वरला आधीच गर्दी त्यात ग्रहण काळात भाविकांनी गर्दी केली होती.
ग्रहणानिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात पहाटेपासूनच भाविकांना बंदी करण्यात आली होती. त्याऐवजी देवस्थान ट्रस्टतर्फे विश्वस्त दिलीप तुंगार, प्रशांत गायधनी, पवन भुतडा, संतोष कदम आदी विश्वस्त उपस्थित होते. ग्रहण सुटेपर्यंत धार्मिक विधी सुरू होते.

Web Title: Religious events in Trimbak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.