पर्युषण समाप्तीनिमित्त धार्मिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:25 AM2017-08-27T00:25:31+5:302017-08-27T00:25:36+5:30
आर्टिलरी सेंटररोड येथील श्री मुनिसुव्रत स्वामी जैन मंदिरात शनिवारी महापूजा व इतर धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी संपूर्ण मंदिर विविध फुलांच्या माळांनी व आकर्षक रांगोळी काढून सजविण्यात आले होते.
नाशिकरोड : आर्टिलरी सेंटररोड येथील श्री मुनिसुव्रत स्वामी जैन मंदिरात शनिवारी महापूजा व इतर धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी संपूर्ण मंदिर विविध फुलांच्या माळांनी व आकर्षक रांगोळी काढून सजविण्यात आले होते. पर्युषणातील आठ कर्तव्यांपैकी वर्षभरातून एकदा मंदिराची महापूजा केली जाते. शुक्रवारी पर्युषण समाप्ती झाल्यानंतर महापूजेनिमित्त शनिवारी संपूर्ण मंदिर आतून व बाहेरून विविध फुलांच्या माळांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते. मंदिरातील मूर्तींनादेखील विविध प्रकारच्या फुलांनी सजविले होते. तसेच मंदिरात फुलांची व सभागृहात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. यंदा महापूजेचा चढावा संजयभाई लुणावत यांनी घेतला होता. सायंकाळी मंदिरात श्री मुनिसुव्रत स्वामी व इतर मूर्तींची १०८ दिव्यांनी महापूजा, आरती करण्यात आली. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम प.पू.गीतपूर्णाश्रीजी म.सा. आदि ठाणा सात यांच्या अधिपत्याखाली पार पडले. यावेळी जैन मूर्तिपूजक श्रावक संघाचे संघपती कन्हैयालाल कर्नावट, जैन श्रावक संघ संघपती डॉ.राजेंद्र मंडलेचा, गिरीश शहा, पृथ्वीराज बोरा, नितीन कर्नावट, संदीप कर्नावट, चेतन बोरा, विनय कर्नावट, डॉ. पटणी, महेश शहा, ज्ञानचंद बाफना, सुभाष घिया, संतोष धाडीवाल, राजू धाडीवाल, नितीन शहा, प्रकाश लोढा, अमोल पारख आदिंसह जैन बांधव व महिला उपस्थित होते.