ब्रह्मकल्पोत्सवाची धार्मिक कार्यक्रमांनी सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 11:47 PM2017-10-05T23:47:49+5:302017-10-06T00:10:42+5:30
येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुरातन श्री व्यंकटेश बालाजी देवस्थानतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित ब्रह्मकल्पोत्सवाची सांगता एकादशीस लक्ष्मीसहीत व्यंकटेश बालाजीच्या मूर्तीची सजविलेल्या रथावर भव्य मिरवणूक काढून करण्यात आली.
मालेगाव : येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुरातन श्री व्यंकटेश बालाजी देवस्थानतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित ब्रह्मकल्पोत्सवाची सांगता एकादशीस लक्ष्मीसहीत व्यंकटेश बालाजीच्या मूर्तीची सजविलेल्या रथावर भव्य मिरवणूक काढून करण्यात आली. मोठ्या संख्येने महिला, पुरुष भाविक या रथ मिरवणुकीत सहभागी झाले होते.
येथील रथ गल्लीतील श्री व्यंकटेश बालाजी देवस्थानतर्फे यंदा १९५ वा ब्रह्मकल्पोत्सव साजरा केला गेला. भगवती लक्ष्मीसहीत व्यंकटेश बालाजी मूर्तीची दररोज महापूजेसह सायंकाळी रथावरून मिरवणूक काढण्यात आली होेती.
सुदर्शन चक्र, नाग, मोर, सिंह, पुष्पक विमान, पालखी, हत्ती, गरूड, मारुती, सूर्यनारायण तसेच दसºयाच्या दिवशी घोडा वाहनावर ही रथ मिरवणूक काढण्यात आली होती. दहा दिवस रथ मिरवणुकीसह मंदिरात सहस्त्र तुलसी, पुष्प, हिरण्य, दीप, फल, कुमकुम अर्चना महापूजा मंदिरात करण्यात आली. एकादशीनिमित्त फुलांनी सुशोभीत मोठ्या रथावर लक्ष्मी व बालाजींची भव्य मिरवणूक काढण्यात आली. आयुष अग्रवाल यांच्या हस्ते पूजा करण्यात येऊन रथ मिरवणुकीस दुपारी प्रारंभ केला गेला. शहरात ही रथ मिरवणूक फिरविण्यात आली.
ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत महिलांचे ढोल पथक लक्ष वेधून घेणारे होते. या रथ मिरवणुकीचे ठिकठिकाणी सडा रांगोळीसह पुष्पवृष्टी करण्यात येऊन स्वागत केले जात होते. गोविंदा-गोविंदाच्या जयघोषाने मिरवणूक मार्ग भाविकांनी दणाणून सोडला होता. रात्री १० वाजता मंदिरात या रथ मिरवणुकीची सांगता केली गेली. द्वादशीस बालाजींच्या महाआरतीसह महाप्रसाद वाटपाने या ब्रह्मकल्पोत्सवाची सांगता मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात केली गेली. ब्रह्मकल्पोत्सव यशस्वीतेसाठी मंदिराचे पुजारी मिलिंद गोसावी, अर्चना गोसावी यांच्यासह मनोज हेडा, आशिष परवाल, अमोल पोफळे, शीतल बोथरा, व्यंकटेश बडाळे, गौरव बेंडाळे, विशाल घोषके, पुष्कर सायखेडकर, विशाल बोरसे, राजेश प्रभूणे, महेश खरोटे, भाग्येश वैद्य, सुधाकर सोनार, राजेंद्र शेगावकर, दिनेश मोरे, आनंद काबरा, चेतन लढ्ढा, दीपक सावळे, मीनल प्रभूणे, अनुराधा कोतूळकर, योगिता पाटणकर, गायत्री जाखोट्या, नेरकर, ज्योत्स्ना सोनार, मंगला गोसावी, वैभवी जोशी, बाफणा, जोशी, नकुल कोतकर, लवकेश भावसार, समीर माळी, अल्पेश बोथरा, दिनेश तिवारी, अमर आघारकर, पवन दुसाने, शशिकांत गोसावी यांनी परिश्रम घेतले.