स्थलांतरामुळे जिल्हा बँकेचे दप्तर हलवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 10:37 PM2021-06-09T22:37:04+5:302021-06-10T00:52:06+5:30

ब्राह्मणगाव : ठेवीदार व शेतकऱ्यांचा मोठा विरोध असतानादेखील येथील जिल्हा बँकेची शाखा लखमापूर शाखेत एकत्रित करण्यात आल्याने मंगळवारी येथील शाखेतील सर्व दप्तर, साहित्यही ट्रॅक्टरमध्ये भरून हलवण्यात आले.

The relocation moved the District Bank backpack | स्थलांतरामुळे जिल्हा बँकेचे दप्तर हलवले

स्थलांतरामुळे जिल्हा बँकेचे दप्तर हलवले

Next
ठळक मुद्देकृषी मंत्री दादा भुसे यांनाही साकडे घातले होते.

ब्राह्मणगाव : ठेवीदार व शेतकऱ्यांचा मोठा विरोध असतानादेखील येथील जिल्हा बँकेची शाखा लखमापूर शाखेत एकत्रित करण्यात आल्याने मंगळवारी येथील शाखेतील सर्व दप्तर, साहित्यही ट्रॅक्टरमध्ये भरून हलवण्यात आले.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अद्याप अनेक सर्वसामान्य जनतेच्या, सहकारी संस्थांच्या ठेवी अडकल्या आहेत. शाखा स्थलांतर होऊ नये म्हणून येथील शेतकरी नेते प्रा. के. एन. अहिरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, ठेवीदार यांनी आदोलन करत कृषी मंत्री दादा भुसे यांनाही साकडे घातले होते. ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदार संतप्त झाले आहेत. गावातील शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या एवढ्या मोठ्या विविध कार्यकारी सहकारी संस्था, पतसंस्था, यामुळे अडचणीत आल्या आहेत.

Web Title: The relocation moved the District Bank backpack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.