गुंजाळ विद्यालयातील लसीकरण केंद्राचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 12:02 AM2021-06-29T00:02:24+5:302021-06-29T00:03:47+5:30
चांदवड : शहरातील कोविड लसीकरण केंद्र सोमवारपासून पुन्हा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात स्थलांतरित झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.
चांदवड : शहरातील कोविड लसीकरण केंद्र सोमवारपासून पुन्हा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात स्थलांतरित झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.
स्थलांतरित झालेल्या लसीकरण केंद्रावर पहिल्याच दिवशी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. गेल्या तीन दिवसांपासून १८ वर्षांपुढील तरुणांनाही लसीकरण सुरू झाल्याने तरुणही गर्दी करीत आहेत तर मर्यादित डोस उपलब्ध असल्याने आरोग्य विभागाने टोकन पद्धतीने व नोंदणी पद्धतीने डोस दिले जात आहे. गर्दी वाढत असल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी होऊन बसली आहे.
लसीकरणासाठी येणारे नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे दिसून येत आहे. ट्रामा केअर कोविड सेंटर येथे श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींची कोविड चाचणी करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. वर्गात प्रवेश पाहिजे असल्यास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कोविडचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक केल्याने या चाचणी केंद्रावर रांगा लागल्या होत्या.
फोटोची ओळ 28 एम.एम.जी.4-
चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड चाचणी केंद्रावर चाचणी करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केलेली गर्दी.