जुन्या आठवणीना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 03:16 PM2019-05-12T15:16:06+5:302019-05-12T15:16:14+5:30
जायखेडा:येथील जनता इंग्लिश स्कूलच्या १९९१ सालातील एकता ग्रुप च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नाशिक येथे संपन्न झाला. कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून वर्गशिक्षक बी. एम. ठाकरे व एन. पी. वाघ उपस्थित होते. यानंतर दिवंगत मित्र - मैत्रिणींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्नेह भेटीचा आनंद स्पष्ट दिसत होता. सुमारे तीस पिस्तस माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी यावेळी उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांच्या नोकरी व्यवसाय, कुटुंबाविषयी जाणुन घेतले. अनेक वर्षांनी एकञ आल्याने विद्यार्थी दशेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
कार्यक्र माचे सूत्रसंचालन जयंत देवरे यांनी तर प्रास्ताविक जयवंत खैरनार यांनी केले. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याच्या संगोपनाचा निश्चय यावेळी करण्यात आला.
कार्यक्र मा दरम्यान शकुंतला खैरनार, वंदना ब्राम्हणकार, प्रविना ब्राम्हणकार, सुजाता गायकवाड, सुनीता महाजन, कल्पना सूर्यवंशी, शैला गांगुर्डे, पुष्पा पाटील, प्रतिभा पगार, मृणालिनी भामरे, सविता मोरे, जयंत देवरे, संजय जगतात, जयवंत खैरनार, पांडुरंग शेवाळे, मनिष बोरसे, सुनिल बागुल, दादाजी घरटे, आदिंनी शालेय जिवणातील जुन्या आठवणींना उजाळा दिला व कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. किरण पाटील यांनी आभार मानले.
प्त सोबत फोटो - जायखेडा येथील एकता ग्रुपच्या स्नेह मेळाव्या निमित्ताने जमलेले माजी विद्यार्थी व शिक्षक.(12 जायखेडा एकता)