रेमडेसिवीरची स्वस्ताई नावालाच; लूट सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:15 AM2021-04-27T04:15:23+5:302021-04-27T04:15:23+5:30

नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांवर उपचारासाठी लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढती आहे. त्यातुलनेत ...

Remdesivir's cheap name only; Loot continues | रेमडेसिवीरची स्वस्ताई नावालाच; लूट सुरूच

रेमडेसिवीरची स्वस्ताई नावालाच; लूट सुरूच

Next

नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांवर उपचारासाठी लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढती आहे. त्यातुलनेत साठा उपलब्ध होत नसल्याने मध्यंतरी काळाबाजार तर वाढलाच शिवाय रुग्णांच्या नातेवाइकांना देखील इंजेक्शनसाठी मेडिकल दुकानाबाहेर रात्रंदिवस उभे राहावे लागत आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने इंजेक्शन वितरणाची जबाबदारी घेतली असून खासगी रुग्णालयांनी मेल पाठवल्यानंतर त्यांना वितरण करण्यात येते, परंतु मागणीनुसार जिल्हा प्रशासनाकडेदेखील पुरवठा हाेत नाही. त्यामुळे त्यांची अडचण होते आणि दुसरीकडे रुग्णांना इंजेक्शनसाठी ताटकळावे लागू नये यासाठी अगतिक झालेले नागरिक खासगी मार्केटममध्ये मिळेल त्या दुप्पट, तिपट्ट दराने इंजेक्शन खरेदी करीत आहेत.

इन्फो...

तुम्हीच जिल्हाधिकारी कार्यालयात जा...

शहरातील एका रुग्णालयात रेमडेसिवीर मिळत नसल्याने त्याने संबंधित रुग्णाच्या नातेवाइकांना इंजेक्शन तुम्हीच घेऊन या जिल्हा प्रशासनाकडे आम्ही मेल केला आहे, असे सांगितले. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक त्याठिकाणी धावपळ करीत गेले. मात्र साठा आला की थेट रुग्णालयांनाच देण्यात असे सांगून नातेवाइकांना माघारी परतवले.

इन्फो...

नंदुरबार, जळगाव, येवला...

एका रुग्णाच्या नातेवाइकांना इंजेक्शन आणण्यासाठी सांगितल्यानंतर त्यांनी अनेक ओळखीपाळखीने प्रयत्न केले. मात्र येवला, जळगाव, किंवा नंदुरबार येथे मिळू शकेल अशी वेगवगळी तालुका आणि जिल्ह्यांची नावे सांगून अक्षरश: काळ्या बाजारात तिप्पट चारपट किमती सांगितल्या आहेत.

इन्फो...

खासगी रुग्णालयांची अडचण

शासनाने काळाबाजार रोखण्यासाठी इंजेक्शनचे दर निश्चित केले असली तरी सरकारी दर नावालाच आहेत. जिल्हा प्रशासनाकडून वितरीत होणारे इंजेक्शन किंवा मोठ्या कार्पोरेट हॉस्पिटलला एजन्सी कोडमुळे थेट इंजेक्शन पुरवले जात असले तरी अन्य खासगी रुग्णालयात मात्र अशाप्रकारे पुरवठा होणे कठीण असल्याने इंजेक्शनचा काळाबाजार संपलेला नाही.

इन्फो...

सोशल मीडियावरून मिळते गिऱ्हाईक

सध्या कोणाला रुग्णालयात बेड, ऑक्सिजन बेड किंवा इंजेक्शन हवे असेल तर सोशल मीडियावर नागरिक टाकतात. तसेच इंजेक्शन आणि ऑक्सिजन हवा असल्यास संपर्क साधा, अशादेखील पोस्ट व्हायरल होतात. त्यावर संपर्क केल्यानंतर देखील अनेकांना काळ्याबाजारासाठी गिऱ्हाईक सापडते.

इन्फो..

३,०३,९९४

कोरोनाचे एकूण रुग्ण

४८,५७१

सध्या उपचार सुरू असलेले

२५०

व्हेंटिलेटरवरील रुग्ण

इन्फो....

१०० एमजी इंजेक्शनच्या नव्या किमती (नवे दर)

कँडीला ८९९ रु.

सिल्जीन इंटरनॅशनल २४५० रु.

डॉ. रेड्डीज २७०० रु.

सिप्ला ३००० रु.

मायलॉन ३४०० रु.

ज्यिब्युलंट ३४०० रु.

हेटरो ३४९० रु.

Web Title: Remdesivir's cheap name only; Loot continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.