मालेगावातील रुग्णासाठी रेमडीसिविरची व्यवस्था करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:49 IST2020-09-25T23:17:53+5:302020-09-26T00:49:42+5:30
नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून मालेगावातील सर्वसामान्य गरजू रुग्णांसाठी देखील रेम्डीसिवीर औषधांचा पुरवठा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मालेगावातील रुग्णासाठी रेमडीसिविरची व्यवस्था करावी
नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून मालेगावातील सर्वसामान्य गरजू रुग्णांसाठी देखील रेम्डीसिवीर औषधांचा पुरवठा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्'ामधील कोविड - 19 चे रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असणाºया रेम्डीसिवीर औषधांचा पुरवठा सर्वसामान्य गरजू रुग्णांना वेळेवर होणेसाठी आदेश आज देण्यात आले आहेत. याच धर्तीवर मालेगाव कार्य क्षेत्रासाठी यथोचित व्यवस्था निर्माण करण्याचे आदेश मालेगांवचे अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा घटना व्यवस्थापक धनंजय निकम यांना दिले.
रेम्डीसिवीर या औषधाचा कोरोना रुग्णासाठी तातडीचे उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर सुरू असून त्या अनुषंगाने सदर औषधांचा पुरवठा रुग्णांना वेळेवर होणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. या औषधाच्या विक्री व विनियोग याचे योग्य समन्वय व सनियंत्रण होणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. सद्यस्थितीत या औषधाची विक्री अनेक विविध ठिकाणांवरून होत असल्यामुळे त्यावर प्रभावी संनियंत्रण राखणे जिकिरीचे होत असल्याचे मांढरे यांनी या आदेशात म्'ाटले आहे.
मालेगाव मध्ये औषधाची विक्री करताना शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन संबंधित विक्रीच्या ठिकाणावरून होत आहे किंवा नाही, गरजू रुग्ण यांना वेळेवर व योग्य किमतीत औषध उपलब्ध होते का? याची खात्री करावी तसेच
उपलब्ध साठ्याची माहिती विक्री ठिकाणाच्या दर्शनी भागामध्ये प्रदर्शित केली जाईल याबाबत दक्षता घेण्याचे सूचना त्यांनी दिल्या आहेत. या बाबत पथक नियुक्त करून कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत