ग्रामीण भागातील कोविड रुग्णांसाठी रेम्डीशिवर उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 11:51 PM2020-10-05T23:51:01+5:302020-10-06T01:16:13+5:30
नाशिक : जिल्'ातील ग्रामीण भागातील अत्यवस्थ कोविड रुग्णांना मोफत व तात्काळ अत्यावश्यक उपचार मिळण्यासाठी रेम्डीशिवर इंजेक्शन खरेदी करण्यात आले असून, तात्काळ तपासणीसाठी 10 हजार अँटिजेंन किट ही उपलब्ध झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली आहे.

जिल्'ातील ग्रामीण भागातील अत्यवस्थ कोरोना रुग्णांना खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या दुरापास्त होत असून, ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेऊन ग्रामीण भागात दाखल होणाऱ्या कोविड रुग्णांना चांगल्या प्रतीची आरोग्य सेवा तात्काळ उपलब्ध होण्यासाठी नाशिक जिल्'ातील चांदवड, पिंपळगाव, सिन्नर व लासलगाव येथील कोविड केअर सेंटर येथे इंजेक्शन रेम्डीशिवर पुरविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची तपासणी तात्काळ होण्यासाठी साधारण १०००० अँटीजन किट सुद्धा खरेदी करण्यात आलेल्या आहेत. कोरोना बाधित रुग्णांना ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर मध्ये उपचार करण्यात येत आहेत. सदर रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तात्काळ चाचणी होण्यासाठी अँटीजन चाचणी करण्यात येत आहे. संशयित रुग्णांच्या जास्तीत जास्त चाचण्या करण्याची सोय त्यामुळे झाली आहे.
ग्रामीण भागात राहणाºया जनतेने अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे. अत्यावश्यक काम असेल तर एकाच व्यक्तीने घराबाहेर पडावे. घराबाहेर पडतांना तोंडाला कायम मास्कचा वापर करावा. कोरोना संदर्भात काही लक्षणे आढळल्यास तात्काळ सरकारी दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी केले आहे.