पंचाळे येथे उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 10:32 PM2020-04-06T22:32:10+5:302020-04-06T22:36:18+5:30
सिन्नर : कोरोना साथींच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पंचाळेचे ग्रामस्थ सरसावले आहे. ग्रामस्थही त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत आहे. या पूर्वी मागील आठवड्यात ग्रामपंचायतीने गावात जंतुनाशक फवारणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : कोरोना साथींच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पंचाळेचे ग्रामस्थ सरसावले आहे. ग्रामस्थही त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत आहे. या पूर्वी मागील आठवड्यात ग्रामपंचायतीने गावात जंतुनाशक फवारणी केली.
ग्रामस्थांना मध्यवर्ती ठिकाणी बसण्यासाठी बसवलेल्या बाकांवर आॅइल, वंगण टाकले आहे. त्यामुळे सध्या गर्दीवर नियंत्रण आले असून, दर शुक्रवारी असणारा आठवडे बाजार पूर्णपणे बंद केल्याने सुरक्षित अंतर ग्रामस्थांमध्ये दिसत आहे. तसेच आज पंचाळे ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये प्रवेश करणारा मुख्य रस्ता दगड टाकून बंद करण्यात आला.
पंचाळे हे गाव मध्यवर्ती असून या गावातून जाण्यासाठी संगमनेर पुणे शिर्डी ओझर विमानतळ लासलगाव मार्गे मध्य प्रदेश बिहार ओरिसा या राज्यांमध्ये जाता येते. हा जवळचा मार्ग असल्याने व व मोबाईल लोकेशनवर साठी हाच मार्ग दिसत असल्याने गावातून शेकडो वाहने दररोज ये जा करतात. यावेळी प्रभारी सरपंच संदीप शरद माजी सरपंच बाळासाहेब थोरात, नंदू बेलोटे, अरुण थोरात, प्रीतेश मालपाणी, राहुल मालपाणी, रवींद्र जगताप, वाल्मीक नवले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.वाहनांना ‘नो एन्ट्री’सध्या कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे पुणे - मुंबई येथून येणारी वाहने थेट गावामध्ये प्रवेश करत असल्याने संभाव्य धोका टाळावा म्हणून ग्रामस्थांनी गावाच्या प्रवेशद्वारावर दगड टाकून चारचाकी वाहनांना प्रवेश बंद केला आहे. त्यामुळे यानंतर पुणे-मुंबई-शिर्डी मध्य प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश येथे जाणारी वाहने चुकूनही गावामध्ये प्रवेश करणार नाही त्यामुळे करोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा एक उपाय ग्रामस्थांनी केला आहे.